डाळींबाचा दुसरा बहर सुरू: मिळाला 'हा' उच्चांकी भाव

Pomegranate price get higher price in pune Market yard
Pomegranate price get higher price in pune Market yard

मार्केट यार्ड : घाऊक फळ बाजारात रविवारी एका शेतकऱ्याच्या डाळींबाला किलोला तब्बल 251 रुपये इतका उच्चांकी भाव मिळाला. हौशिराम आबा आटोळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. दोन दिवसांपूर्वी आटोळे यांच्या डाळींबाला किलोस 191 रुपये भाव मिळाला होता. गेल्या काही दिवसात डाळिंबाच्या भावात वाढ होत आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे विभागप्रमुख दत्तात्रय कळमकर यांच्या हस्ते आटोळे यांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळी गटप्रमुख बाळासाहेब कोंडे उपस्थित होते. फळ बाजारातील यशवंत कोंडे, यशराजे कोंडे यांच्या गाळ्यावर ही आवक झाली होती. 

वारिस पठाण यांनी शब्द मागे घेतले, माफी नाहीच 

बाजारात डाळींबाचा दुसरा बहर सुरू झाला आहे. बाजारात सध्या डाळींबाची आवक कमी आणि मागणी जास्त आहे. तसेच दर्जेदार फळाला मोठी मागणी आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव सध्या तेजीत आहेत.  रविवारी बाजारात  150 टन डाळींबाची आवक झाली. बाजारात सोलापुर, नगर, सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागातून आवक होते. हंगामातील एक बहर अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे आवक घटून भाव वाढ होत आहे. बाजारात सध्या नविन बहराची तुरळक आवक सूरू झाली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून आवक सुरळित सुरू होईल. 

घाऊक बाजारात भगवा, गणेश आणि आरक्ता डाळींबास किलोस अनुक्रमे 35 ते 120, 10 ते 40, आरक्ता 10 ते 60 रुपये भाव मिळत आहे. तर किरकोळ बाजारात ३० ते २०० रुपये किलोस भाव मिळत आहे. लिलावामध्ये राजू सर्यवंशी यांनी 251 रुपये किलोप्रमाणे डाळिंब खरेदी केले. एक डाळिंब 700 ते 800 ग्रॅम वजनाचे असल्याचे यशराज कोंडे यांनी सांगितले.

कुत्रं पाळणं ठरतंय स्टेटस सिम्बॉल

मार्केट यार्डात दिवसेनदिवस डाळींबाची आवक वाढत आहे. त्या तुलनेत व्यापारासाठी उपलब्ध असलेली जागा अपुरी आहे. त्याचा त्रास शेतकऱ्यांना होत आहे. त्यामुळे डाळींब व्यापारासाठी बाजार समिती प्रशासनाने अधिक जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
- यशवंत कोंडे, आडते, मार्केट यार्ड.

खडीमशिन चौक-मंतरवाडी रस्ता धोकादायक 

निसर्गाने साथ दिल्यास गेल्या वर्षभरात झालेल्या चांगल्या पावसाचा फायदा येणाऱ्या बहराला होणार आहे. पुढील बहरात आवक चांगल्या प्रमाणात होईल. तर, फळाचा दर्जा आणि फळाला गोडी चांगली असेल. नोव्हेंबर आणि डिंसेबर महिन्यात झालेल्या पावासाचा फटका डाळिंबाला बसला आहे. फळधारणा होतानाच पाऊस झाल्याने उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात कमी प्रतीच्या डाळिंबाचे प्रमाण अधिक आहे. 
- युवराज काची, उपाध्यक्ष, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com