बारामती: सात सात सतराचा मुहूर्त साधणाऱ्या प्रेमीयुगलाला अटक

चिंतामणी क्षीरसागर
रविवार, 30 जुलै 2017

पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमेश्र्वरनगर येथे शिक्षण घेत होती. आरोपी किशोर हा खाजगी गाडीवर चालक म्हणुन काम करतो. मुलीच्या कुटुंबाने बाहेरगावी जाण्यासाठी अनेक वेळा आरोपी किशोरची गाडी भाड्याने नेली होती. यातून ओळख झाल्याने दोघांच्यात प्रेमसंबध जुळले. सात सात सतराचा मुहूर्त काढून दोघेही एकसाथ राहण्यासाठी कॉलेजमधून मुलगी किशोर सोबत निघुन गेली.

वडगाव निंबाळकर : बारामती तालुक्यातील सोमेश्र्वरनगर येथील एका कॉलेजमधील प्रमी युगलाचे सात सात सतारा तारखेच्या मुहुर्तावर पळुन जाउन एकमेकांचे कायमचे साथीदार होण्याचे स्वप्न भंगले आहे. कारण मुलीच्या वडिलांनी मुलगी अल्पवयीन असल्याचा पुरावा देउन पोलिसात तक्रार दाखल केली होती. यामुळे पोलिसांनी प्रेमी युगलाला शोधुन गजाआड केले आहे.

किशोर महादेव खिलारे (वय ३० रा. पाडळी ता. खंडाळा) असे प्रेमवीराचे नाव असून त्याच्यावर अल्पवयीन मुलीला पळवून नेने व बाल लैंगीक अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पळून जाण्यास सहकार्य केल्याबाबत आरोपीचा भाउ रामदास महादेव खिलारे यालाही सहआरोपी करण्यात आले आहे.

याबाबत वडगाव निंबाळकर पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी सोमेश्र्वरनगर येथे शिक्षण घेत होती. आरोपी किशोर हा खाजगी गाडीवर चालक म्हणुन काम करतो. मुलीच्या कुटुंबाने बाहेरगावी जाण्यासाठी अनेक वेळा आरोपी किशोरची गाडी भाड्याने नेली होती. यातून ओळख झाल्याने दोघांच्यात प्रेमसंबध जुळले. सात सात सतराचा मुहूर्त काढून दोघेही एकसाथ राहण्यासाठी कॉलेजमधून मुलगी किशोर सोबत निघुन गेली. याबाबत मुलीच्या वडीलांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला होता. संशयावरून आरोपी किशोरचा भाउ रामदास याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवल्याने त्याने आपणच खोली घेउन देण्यास मदत केल्याची कबुली दिली. दोघांनाही पुण्यात ताब्यात घेतले, सुमारे बावीस दिवस एकत्र होते आमचे प्रेम आहे. शरिर संबध आल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी वैद्यकीय तपासणीचा निर्णय घेतला आहे. आज रविवार ता. ३० रोजी बारामती येथील न्यायालयासमोर हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: pune news couple arrested in Baramati