पुण्यात विनापरवानगी रस्ता खोदाई पाडली बंद

संदीप जगदाळे
सोमवार, 26 जून 2017

विरोध पक्ष नेते चेतन तुपे यांनी बंद पाडली

हडपसर (पुणे): पावसाळयात रस्ते खोदाईला बंदी असताना विनापरवानगी रस्ता खोदून भीमीगत केबल टाकणा-या खासगी कंपनीचे काम विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांनी बंद पाडले. संबधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून संबधित कंपनीच्या केबल जप्त करुन संबधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी यासाठी अधिका-यांना सूचना दिल्या. काही स्थानिक उपद्रवी लोकांच्या मदतीने हे काम सुरू असून यामध्ये लाखो रूपयांचा अपहार होत असल्याची तक्रार तुपे यांनी केली.

तुपे म्हणाले, गेल्यावर्षीच २० लाख रूपये खर्चून पालिकेने सोलापूर रस्त्यावर गाडीतळ येथे नागरिकांच्या करातून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पदपथ उभारला आहे. मात्र सलग तिन दिवस पालिकेला सुटी आहे. याचा फायदा घेत संबधित ठेकेदाराने केबल टाकण्यासाठी खोदाई करून केबल टाकण्याचे काम सुरू केले होते. गाडीतळ बस डेपो ते साधना बॅंक या दरम्यान रस्ते खोदून व पदपथावरील ब्लॅाक काढून हे काम केल्याने पालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांच्या तक्रारी आल्यानंतर घटनास्थळी जावून काम बंद केले. तसेच पथ विभागाच्या अधिका-यांना संबधित कंपनी व ठेकेदाराला शोधून कारवाई करण्याच्या सूचना पथ विभागाला दिल्या आहेत.

पथ विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणाले, खोदाई केलेल्या ठेकेदाराने एअरटेल कंपनीची केबल टाकत असल्याचे सांगितले. मात्र, या कंपनीशी संपर्क साधला असता आमच्या नावावर दुसरया कंपनीचे काम सुरू असेल. या खोदाईशी आमचा कोणताही संबध नसल्याचे सांगितले. आम्ही याबाबत हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार देणार आहोत. संबधितांवर कडक कारवाई होईल याची आम्ही निश्चीतपणे दखल घेवू.

वाहतुकीचे तीनतेरा वाजले असताना, तसेच सुंदर पदपथ बनविला असताना पावसाळ्यात खोदाईला बंदी असताना या कंपन्या परवानगी न घेता खोदाई करतात, ते ही पावसाळ्यात त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी देखील संताप व्यक्त केला आहे. रस्ता व पदपथ खोदल्यामुळे आणि पावसाळा सुरू असल्याने दुकानदार व ग्राहक देखील त्रस्त आहेत. नागरिकांच्या कराच्या पैशातून केलेल्या विकास कामांचे नुकसान होत आहे. त्यामुळे संबधिक कंपनीवर कारवाई झालीच पाहिजे अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

Web Title: pune news Dump road in hadapsar