पुण्यात अंगावर भिंत कोसळून मायलेकींचा मृत्यू

पुण्यात अंगावर भिंत कोसळून मायलेकींचा मृत्यू
पुण्यात अंगावर भिंत कोसळून मायलेकींचा मृत्यू

हडपसर (पुणे): पुणे शहर परिसरात आज (शुक्रवार) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावसाने थैमान घातले होते. मुसळधार पावसामुळे भिंत अंगावर कोसळून एक महिला व तिच्या मुलीचा मृत्य झाल्याची घटना मांजरी भागात घडली. यामध्ये एक लहान मुलगा जखमी झाला आहे.

मांजरी रोड येथील दीपकनगर, गोपाळ पट्टी येथे मुसळधार पावसामुळे घरांचे पत्रे उडून गेले. या परिसरात राहणाऱ्या शीतल नारायण क्षीरसागर (वय २५) व दिव्या नारायण क्षीरसागर (वय ५) या दोन्ही मायलेकींचा अंगावर भिंत कोसळल्यामुळे  त्यांचा मृत्यू झाला आहे. विशाल नावाचा एक लहान मुलगा जखमी झाला आहे.

घटनास्थळी बचाव कार्यात स्थानिक नागरीक, हडपसर पोलिस व अग्निशमन दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते. मृत्युमुखी पडलेली महिला व तिच्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. जखमी मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आकस्मात मयत अशी नोंद हडपसर पोलिस ठाण्यात करण्यात आलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com