पिंपरी-चिंचवड शहरातील हवा, पाणी यांच्या प्रदूषण पातळीत वाढ

दीपेश सुराणा
गुरुवार, 20 जुलै 2017

महापालिका पर्यावरण अहवालातील निष्कर्ष; मानवी आरोग्य, पर्यावरणावर विपरीत परिणाम

पिंपरी : शहरातील हवा, पाणी यांच्या प्रदूषण पातळीत गेल्या तीन वर्षांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मानवी आरोग्य आणि नैसर्गिक पर्यावरणावर झाला आहे. महापालिकेने तयार केलेल्या 2016-17 या वर्षाच्या पर्यावरण सद्य:स्थिती अहवालात मांडलेल्या वस्तुस्थितीतून हा निष्कर्ष समोर आला आहे.

तीन वर्षात शहरातील उद्यानांचे क्षेत्रफळ वाढलेले दिसून आले आहे. तथापि, लागवड केलेल्या वृक्षांच्या संख्येत घट झाली आहे. गेल्या तीन वर्षांच्या पर्यावरण अहवालाचे अवलोकन 2016-17 च्या पर्यावरण अहवालात केलेले आहे. त्या आधारे हे चित्र समोर आले आहे. वाढते शहरीकरण आणि औद्योगिक क्षेत्रात झालेली वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषणाच्या पातळीत दरवर्षी वाढ होत आहे. 2013 ते 2016 अशा तीन वर्षांच्या कालावधीत पीएम 2.5 ची (धुलिकण) पातळी हा मानांकापेक्षा कमी असल्याचे दिसून येते. तर, 2014-15 व 2015-16 मध्ये पीएम 10 (धुलिकण) पातळी ही मानांकापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले आहे.

शहरातील नदी प्रदुषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे 13 मैलाशुद्धीकरण केंद्र उभारले आहेत. त्या माध्यमातून मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाते. 2013-14 मध्ये दररोज सरासरी 224.2 दशलक्ष लिटर इतक्‍या पाण्यावर प्रक्रिया केली जात होती. आता त्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. 2014-15 मध्ये सरासरी 230 तर, 2015-16 मध्ये 242.2 दशलक्ष लिटर इतक्‍या पाण्यावर दररोज प्रक्रिया करण्यात आली. मैलाशुद्धीकरण प्रकल्पाची योजना असली तरीही नाल्याचे पाणी प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी प्रदूषणाचे प्रमाण वाढले असल्याचे अहवालात नमूद आहे. हवा, पाणी प्रदूषणाच्या बाबतीत शहरात विदारक स्थिती आहे. मात्र, शहरातील एकूण क्षेत्रफळाच्या 29 टक्के इतके क्षेत्र हरित क्षेत्रात रूपांतरित करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने साध्य केले असल्याची बाब सकारात्मक आहे.

उद्यानांचा तुलनात्मक आढावा (2013 ते 2016) :
तपशील 2013-14 2014-15 2015-16
----------------------------------------------------------------------
एकूण विकसित 157 163 163
उद्याने
-------------------------------------------------------------------------
वृक्षारोपण 27855 41515 34125
----------------------------------------------------------------------
उद्यानांचे
क्षेत्रफळ 143.5 हेक्‍टर 156.60 हेक्‍टर 156.60 हेक्‍टर
-------------------------------------------------------------------------

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा:

Web Title: pune news pimpri chinchwad Increase in Pollution Level