मावळ तालुक्यात पावसाची दमदार हजेरी

ज्ञानेश्वर वाघमारे
रविवार, 25 जून 2017

मुळशी धरण परिसरात सुरु असलेल्‍या पावसामुळे मुळशी धरण जलाशयाच्‍या परिसरात वर्षाविहाराचा आनंद लुटण्‍यासाठी पर्यटकांची पावले या परिसराकडे वळु लागली असून ठिकठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.

पुणे - मावळ तालुक्यात शनिवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. आज (रविवार) सकाळीही सरीवर सरी बरसत होत्या.

आज सकाळी आठ वाजेपर्यंत लोणावळा येथे 150 मिमी, पवना धरण परिसरात 98 मिमी, वडगाव परिसरात  62 मिमी,तळेगाव-दाभाडे परिसरात 48 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात भात हेच खरीपाचे मुख्य पीक असून रोपांच्या वाढीसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा होती. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच दमदार पावसाला सुरवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. तालुक्यातील पर्यटन व्यवसायालाही आता बहर येणार आहे.

मुळशी धरण परिसरात सुरु असलेल्‍या पावसामुळे मुळशी धरण जलाशयाच्‍या परिसरात वर्षाविहाराचा आनंद लुटण्‍यासाठी पर्यटकांची पावले या परिसराकडे वळु लागली असून ठिकठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. ओढे, नाले, डोंगरांच्‍या ओहळी, धबधब्‍यांच्‍या पाणी प्रवा‍हीत होऊ लागले आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिध्‍द असलेला मुळशी धरण परिसर पावसाळयात खुलून येतो. माले घाट, पळसे धबधबा, ताम्हिणी घाट, पिंपरीची दरी ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत. सध्‍या सुरु असलेल्‍या पावसामुळे हवेत आलेला गारवा, डोळयांना सुखावणारी हिरवाई, पावसाच्‍या सरी यामुळे मोठया प्रमाणात पर्यटक सहकुटूंब मुळशी धरण परिसरात ठिकठिकाणी पर्यटनाचा आनंद घेत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
मोदी खरे मित्र: डोनाल्ड ट्रम्प

शेतकऱ्यांना राज्य शासनाचा दिलासा, 7/12 कोरा होणार
पुणे: टेमघरला 44 मिमी पाऊस​
आंदोलनाचा अंशत: विजय : सुकाणू समिती​
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान हुतात्मा​
संजय काकडेंची मेधा कुलकर्णींना फोनवरुन धमकी​
प्रतीकात्मक लढाई (श्रीराम पवार)​
सारीपाट राष्ट्रपतिपदाचा (अनंत बागाईतकर)​

Web Title: Pune news rain in maval dam area