सासवडजवळ अपघातात पोलिस उपनिरीक्षकासह चार कर्मचारी जखमी  

श्रीकृष्ण नेवसे
रविवार, 30 जुलै 2017

वाघापूर मार्गावर पारगाव फाट्यानजीक पत्रावळी कारखान्यानजीक वाहनाचा पुढचा टायर फुटला.

सासवड : पुणे जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेतील फिरते संरक्षण पोलिस वाहन आज सकाळी सासवड (ता. पुरंदर) नजिक पारगाव फाटा येथे टायर फूटून खड्ड्यात आदळले. त्यात एक पोलिस अधिकारी व तीन पोलिस कर्मचारी असे चारजण जखमी झाले. चारपैकी दोघांना दुखापत गंभीर झाली. 

राजु किसन महांगरे (पोलिस वाहन चालक), पोलिस कर्मचारी सुर्यकांत रंगराव कांबळे. संतोष पंडीत व पोलिस उप निरीक्षक गणेश पिंगुवाले हे चारजण जखमी झाले. महांगरे यांचे हाड फ्रक्चर झाले. तर कांबळे यांच्या डोक्याला इजा झाली. बाकी दोन्ही किरकोळ जखमी झाले. जिल्हा ग्रामीण पोलिस यंत्रणेतील फिरते संरक्षण पोलिस वाहन (क्र. एमएच 42 ए 6701) हे पुरंदर तालुक्यातील काम संपवून हवेली तालुक्यात कामासाठी चालले होते. त्यावेळी वाघापूर मार्गावर पारगाव फाट्यानजिक पत्रावळी कारखान्यानजिक वाहनाचा पुढचा टायर फुटला. त्यातून उजव्या बाजूस हे वाहन झुकले व पुढे रस्त्याच्या कडेला दहा फुट जाऊन खड्ड्यात आपटले. त्यातून चारही कर्मचारी जखमी झाले.

याबाबत नजीकचे रामदास सदाशिव मेमाणे (रा. पारगाव) यांनी सासवड पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर उपचारार्थ सर्वांना हलविण्यात आले. तर वाहन सासवड पोलिस ठाण्यात आणले. याबाबत सासवड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद केली आहे., अशी माहिती हवालदार सुरेश गायकवाड यांनी दिली. तर अधिक तपास हवालदार अरविंद बाबर हे करीत आहेत.  

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: pune news saswad police accident