भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
Published on

औषध आणण्यासाठी जाणाऱ्या
ज्येष्ठाचा अपघातात मृत्यू

मंगळवेढा, ता. १९ : आजारी पत्नीसाठी औषध आणण्यासाठी निघालेल्या शेलेवाडी येथील ज्येष्ठ नागरिकाचा चारचाकी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवेढा-सांगोला महामार्गावरील आंधळगावजवळील नडगेरी हॉस्पिटल परिसरात मंगळवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली.
नारायण साधू चव्हाण (वय ६५, रा. शेलेवाडी) असे मृताचे नाव आहे. नारायण चव्हाण हे आजारी पत्नीच्या औषधांसाठी दुचाकीवरून आंधळगावकडे जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या एमएच २९ बीजी ८३५० क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. मात्र, धडकेदरम्यान वाहनाची नंबरप्लेट खाली पडल्याने पोलिसांना वाहनाचा शोध घेणे शक्य झाले आहे. मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शेलेवाडी येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांनी भेट देऊन पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com