काळजी करू नका, हे आश्‍वासन नाही; तर ते माझे कर्तव्य : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

आळंदी(पुणे) : "इंद्रायणी शुद्धीकरणाची वारकरी संप्रदायाची मागणी असून, ती मला भावली. येत्या दहा दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांसोबत इंद्रायणी स्वच्छतेबाबत बैठक लावून पाठपुरावा केला जाईल. आळंदीतील दर्शनबारीबाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल. काळजी करू नका, हे आश्‍वासन नाही; तर ते माझे कर्तव्य आहे,'' असे आश्‍वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले.
 

आळंदी(पुणे) : "इंद्रायणी शुद्धीकरणाची वारकरी संप्रदायाची मागणी असून, ती मला भावली. येत्या दहा दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्र्यांसोबत इंद्रायणी स्वच्छतेबाबत बैठक लावून पाठपुरावा केला जाईल. आळंदीतील दर्शनबारीबाबतीत योग्य निर्णय घेतला जाईल. काळजी करू नका, हे आश्‍वासन नाही; तर ते माझे कर्तव्य आहे,'' असे आश्‍वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले.

une/conspiracy-kill-ncp-leader-sharad-pawar-police-complaint-shivaji-nagar-260052"> 
शरद पवारांच्या हत्येचा कट? पोलिसांत तक्रार, 'सरकार उलथवून टाकण्याचे कारस्थान'​

वारकरी परिषदेच्या वादग्रस्त पत्राला पवारांचं उत्तर; 'तुम्हाला संप्रदायच कळाला नाही'

 

आळंदी (ता. खेड) येथे जोग महाराज यांच्या पुण्यतिथी शताब्दी महोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात प्रमुख पाहुणे म्हणून पवार बोलत होते. या वेळी कामगारमंत्री दिलीप वळसे पाटील, शांतिब्रह्म मारोती महाराज कुरेकर, संदीपान महाराज हासेगावकर, रामराव महाराज ढोक, आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, ऍड. विकास ढगे, विलास लांडे, डी. डी. भोसले आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, "नदी पवित्र व सुंदर राहिली, तर ती समाजाला उपयुक्त आहे. समाजासाठीची मागणी असेल, तर सरकार पाठीशी उभे राहील. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, म्हणून गंगा शुद्धीकरणाचा प्रयत्न देशाच्या पंतप्रधानांनी केला. त्यांनी घाट स्वच्छतेचे काम चांगले केले. तसे इंद्रायणीच्या बाबतीतही घडून आणण्याची काळजी घ्यावी लागेल. श्रद्धेने येणारा माणूस येतो. त्याचा विसावा योग्य रीतीने व्हावा, याची खबरदारी घेतली पाहिजे. सेवेकरी म्हणून काम करायची संधी मिळाली. सेवेबद्दलची बांधीलकी हवी.'' 
पिंपरीत बसथांब्यावर कोसळले झाड: प्रवासी जखमी 
 
पवार म्हणाले, "जनतेने जो अधिकार दिला, त्या अधिकाराचा उपयोग समाजासाठी करायचा असतो, असे संस्कार माझे गुरू आणि श्रद्धास्थान स्व. यशवंतराव चव्हाण यांनी दिले. मिळेल ती संधी, अधिकार ज्याच्यामुळे मिळाले, त्याचे विस्मरण होऊ देऊ नका, असे त्यांनी आम्हाला शिकवले.'' ""शंभर वर्षांपेक्षा अधिक काळ शिक्षण संस्था आज कशाचीही सुविधा नसताना सामान्य माणसाच्या श्रद्धेतून दिमाखात उभी राहिली,'' असे गौरवोद्‌गार त्यांनी जोग महाराज शिक्षण संस्थेबाबत काढले. 

पुण्यात हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी; दहा लाखांच्या खंडणीची मागणी

संतांकडून विचारधारेचे जतन 
शरद पवार म्हणाले, "बाराव्या शतकापासून वारकरी पंरपरा मोठ्या स्वरूपात उदयाला आली. देशाने मोगलांचे आक्रमण पाहिले, ब्रिटिशांचे दीडशे वर्षांचे राज्य पाहिले. त्यानंतर अनेक हल्ले पाहिले. यामध्ये जगातली कोणतीही आक्रमण करणारी शक्ती संतपरंपरेच्या विचाराला थोपवू शकली नाही. याला कारण संप्रदायाबद्दल असलेली वारकऱ्यांची बांधीलकी, हेच आहे. वारकरी संप्रदायाची विचारधारा जतन करून समाजाच्या सर्व घटकांमध्ये पोचविण्याचे काम वारकरी संस्थेतील संतमाहात्म्यांनी करून त्यास उत्तम स्वरूप दिले.'' 

सात वाजता उठायचं नाही, कामाला लागायचं; अजित पवारांचा आव्हाडांना टोला
आळंदीला यावं, हे काही मनामध्ये हेतू ठेवून नव्हतं. पंढरपूर-आळंदी जाण्याचा हेतू प्रदर्शन करण्याकरिता करीत नाही. राजकारणामध्ये अखंड प्रसिद्धीशिवाय दुसरं काही नसतं, असा गोड गैरसमज आहे. 
- शरद पवार, ज्येष्ठ नेते 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sharad Pawar promised to pursue Indrayani purification