esakal | पुणे विभागात कोरोना बाधितांचा आकडा पोहचला 80 वर: पाहा आणखी कुठे, किती रुग्ण आढळले?
sakal

बोलून बातमी शोधा

Total corona infected are 80 In Pune and 3 more corona patients found in the city.jpg

कोरोना संशयित व्यक्तींचे 1 हजार 839 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 663 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 176 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 544 नमुने निगेटीव्ह आहेत. तर 80 जणांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले आहे.

पुणे विभागात कोरोना बाधितांचा आकडा पोहचला 80 वर: पाहा आणखी कुठे, किती रुग्ण आढळले?

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे:  पुणे शहरामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या आज गुरुवारी दुपारी दोन वाजेपर्यंत एकूण 3 ने वाढली असून, पुणे विभागातील एकूण रुग्ण संख्या 80 झाली आहे. त्यात पुणे 39, पिंपरी-चिंचवड 12, सातारा  2, सांगली 25 आणि कोल्हापूर येथील दोन रुग्णांचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत देण्यात आली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

कोरोना संशयित व्यक्तींचे 1 हजार 839 नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 663 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले असून 176 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 1 हजार 544 नमुने निगेटीव्ह आहेत. तर 80 जणांचे नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. आतापर्यंत 18 रुग्णांना बरे झाल्यामुळे रुग्णालयामधून घरी सोडण्यात आले आहे.

आणखी वाचा - अमेरिकेसाठी 9/11पेक्षा कोरोना घातक

10 लक्ष 79 हजार घरांचे सर्वेक्षण : 
पुणे विभागामधील 8 हजार 119 प्रवाशांपैकी 4 हजार 214 प्रवाशांबाबत पाठपुरावा सुरू असून 3 हजार 905 प्रवाशांबाबत पूर्ण झालेला आहे. आजपर्यंत 10 लक्ष 79 हजार 111 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 48 लक्ष 72 हजार 779 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 441 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत.


- Coronavirus : भारतात कोरोनाचे थैमान सुरुच; मृतांची संख्या वाढतीये...


अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त यांच्या माहितीनुसार पुणे विभागात 1 हजार 438 पीपीई किट उपलब्ध आहेत. 19 हजार 639 एन 95 मास्क आणि इतर 2 लाख 6576 मास्क उपलब्ध आहेत.

 - Coronavirus : तबलीगींच्या मौलानाने घेतला यू-टर्न; म्हणाला, 'मी स्वत: ...'

विभागात अन्नधान्य, भाजीपाला, दूध व फळांचा साठा –
•    पुणे विभागातील शासकीय धान्य गोदामात 17 हजार 939 टन धान्यसाठा उपलब्ध आहे.  
•    पुणे विभागात अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत 27 लाख 8 हजार 711 शिधापत्रिकाधारक कुटुंबापैकी 2 लाख 10 हजार 208 कुटुंबांना 52 हजार 916 क्विंटल इतके गहू, साखर, तूरडाळ, चणाडाळ व तांदूळ वितरण करण्यात आले आहे. 
•    मार्केटमध्ये विभागात एकूण 18 हजार 666 क्विंटल अन्नधान्याची अंदाजे आवक असून, भाजीपाल्याची आवक 15 हजार 188 क्विंटल, फळांची 3 हजार 261 क्विंटल तसेच कांदा/ बटाट्याची 16 हजार 389  क्विंटल इतकी आवक झाली आहे.

Coronavirus : 'तबलीगी-ए-जमात' प्रकरणी जुन्नरमधील अन्य धर्मीय युवकाची चौकशी

विभागात 1 एप्रिल अखेर 85.13 लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, 24.44 लाख लिटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. उर्वरित दूध सुट्या स्वरुपात वितरित करण्यात आले आहे. तसेच अन्नधान्याच्या उपलब्धतेबाबत काही अडचण भासल्यास संबंधित जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

पुणे जिल्हा :  1) भानुदास गायकवाड,‍ जिल्हा पुरवठा अधिकारी – 020- 26061013
  2) अस्मीता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी – 020- 26123743
सातारा जिल्हा: 1) स्नेहल किसवे,‍ जिल्हा पुरवठा अधिकारी –  02162- 234840
सांगली जिल्हा:- 1) वसुंधरा बारवे,‍ जिल्हा पुरवठा  अधिकारी –  0233- 2600512
कोल्हापूर जिल्हा :-1) दत्तात्रय कवीतके, जिल्हा पुरवठा अधिकारी – 0231- 265579
सोलापूर जिल्हा : 1) उत्तम पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी –  0217- 2731003/8 

loading image