आदिवासी विद्यार्थ्यांना स्थानिक अभ्यासक्रम, पुस्तके बोली भाषेत पाहिजे

Tribal students need course, books in local language
Tribal students need course, books in local language

कर्वेनगर(पुणे) : "शाळेच्या अभ्यासक्रमात खूप मोठा भाग आमच्या दैनंदिन जीवनाशी, अनुभवाशी जुळत नाही. परिणामी आदिवासी भागातील शाळेत गळती होते. जंगल, शेती, पशुपालन असे अनुभवाचे ज्ञानाचा अभ्यासक्रमात समावेश नसल्याने शिक्षण कंटाळवाणे वाटते. बोलीभाषा शिक्षण नसल्यामुळे ती अडचण येते महिलांमध्ये दुसरी भाषा बोलताना त्या घाबरतात. पुस्तक अभ्यासात आम्ही मागे असलो तरी जंगल, पाणी,  शेतीच्या परंपरागत पद्धती आमच्या तोंडपाठ आहेत. असे मत बाया कर्वे पुरस्कार विजेत्या रुषा वळवी यांनी व्यक्त केले. 

ई-बस म्हणजे लक्ष्मी!

महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षांपासून पासून बाया कर्वे पुरस्कार दिला जातो. यंदाचा 24 वा बाया कर्वे पुरस्कार सातपुडा परिसरात जंगल, वनभाज्या जैवविविधता टिकविण्यासाठी काम करणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील कंजाला येथील रुषा वळवी यांना महापौर मुरलीधर मोहोळ व आदिवासी विभागाचे आयुक्त डॉ.किरण कुलकर्णी यांच्या हस्ते शुक्रवारी संस्थेच्या देण्यात आला. 

दहाची नाणी कोशागारात नको; पीएमपीचा वाहकांना अलिखित आदेश

महर्षी अण्णा, बाया कर्वे व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाला पुरस्कार निवड समितीचे प्रमोद कुलकर्णी, माधुरी नागरस, संस्थेच्या अध्यक्षा स्मिता घैसास, उपकार्याध्यक्ष प्रा.एन.डी पाटील, प्रमोद गोऱ्हे, डॉ. सचिव पी.व्ही.एस. शास्त्री उपस्थित होते. 

पुणे : मिळकतकर भरा, नाहीतर, घरासमोर वाजणार बँड 

स्त्री शिक्षणात मोठे कार्य असलेल्या संस्थेने नर्मदेकाठी आदिवासी भागात सुरू असलेल्या कामाची दखल घेऊन आम्हाला सन्मानित केले. यामुळे मी संस्थेचे ऋणी आहे. अजून आम्हाला पुष्कळ काम करायचे आहे. या पुरस्कारामुळे उत्साह वाढला. असे सांगून रुषा वळवी म्हणाल्या, 'पुणे परिसरात उच्चशिक्षण घेणाऱ्या महिलांनी आमच्या परिसरात सातपुडा परिसरात राहिला यावे. त्यांची व्यवस्था करू. आदिवासी भागात महिलांचे खूप प्रश्न आहेत. आम्हाला शेतीमधील आधुनिक यंत्र व तंत्राची आम्हाला गरज आहे. तसेच शालेय अभ्यासक्रम तयार करणाऱ्या मान्यवरांनी देखील आमच्या परिसरात येऊन आदिवासी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे.'विद्या देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्वेता रानडे यांनी केले तर आभार डॉ. पी.व्ही.एस. शास्त्री यांनी मानले.

पुणेकरांनो, सिंहगडावर जाण्याचा प्लॅन करताय? मग, 'ही' बातमी वाचा

माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील।कार्यक्रमाला उपस्थित नव्हते परंतु त्यांचा शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखविला. 'वनवासी भगिनी रुषा यांचे कार्य खूप मोठे आहे.त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com