'पीएमपी'मध्येही कोरोनाने केली एन्ट्री; दोन कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह!

PMPML-Bus
PMPML-Bus

पुणे : पीएमपीच्या दोन कर्मचाऱ्यांनाही कोरोनाने घेरल्याचे नुकतेच उघड झाले आहे. एक कर्मचारी कात्रज डेपो वर्कशॉपमधील आहे. ते 16 एप्रिलपर्यंत कामावर होते. खबरदारीचा उपाय म्हणून त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील 20 सहकाऱ्यांची प्रशासनाने तपासणी केली. सुदैवाने त्यात कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. दुसरा कर्मचारी मार्केटयार्ड डेपोमध्ये लिपिक आहे. त्याला 3 एप्रिलपासून बरे नसल्याने तो रजेवर होता.

पीएमपीची 26 मार्चपासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे वाहतूक सुरू आहे. त्यासाठी सध्या 120 बस सुरू आहेत. सुमारे 1 हजार कर्मचारी त्यासाठी कामावर आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांनी कोरोनाचे विमा कवच दिले आहे. पुणे महापालिकेने कोरोनामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास 1 कोटी रुपयांपर्यंत मदत करण्याचे जाहीर केले आहे. तर पिंपरी चिंचवड महापलिकेनेही मदतीचा हात पुढे केला आहे.

या दोन्ही महापालिकांच्या विमा कवचमध्ये पीएमपीच्या सध्या कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावे, अशी मागणी पीएमपी प्रशासनाने दोन्ही महापालिकांकडे केली आहे. मात्र, त्या बाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

पीएमपीच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड मधून दररोज सुमारे 15 हजार प्रवाशांची वाहतूक होत आहे. त्यातून सुमारे 1 लाख रुपयांचे उत्पन्न पीएमपीच्या तिजोरीत जमा होत आहे. पीएमपीमधून सध्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नावे लिहिण्याची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाने द्यावेत. त्या मुळे संशयितांचे तपशील हाती येतील, अशी मागणी राष्ट्रवादी पीएमपी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सुनील नलावडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. 

पीएमपीमध्ये सुमारे 10 हजार कर्मचारी आहेत. त्यातील सध्या कामावर असणाऱ्या किमान एक हजार कर्मचाऱ्यांना तरी कोरोनाचे विमा कवच तातडीने उपलब्ध करून घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी पीएमपी कर्मचारी संघटनेचे हरीश ओहोळ यांनी केली आहे.

पुण्यातील भवानी पेठ, येरवडा, घोले रस्ता, येरवडा आणि कसबा क्षेत्रीया कार्यालायच्या अखत्यारित सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. या पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या अखत्यारितील प्रभागांवर महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी सध्या युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या क्षेत्रीय कार्यालयांच्या अंर्तगत येणाऱया भागावर लक्ष ठेवण्यासाठी दहा पोलिस ठाण्यांसाठी सुधारित आदेश बजावण्यात आला आहे.

पुण्यात 9 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. आणि सध्या शहरात कोरोनाचे 1432 रुग्ण असून आत्तापर्यंत 93 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 230 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com