विश्रांतवाडी, मगरपट्टा अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

विश्रांतवाडी येथे झालेल्या अपघातात प्रल्हाद पंढरीनाथ शिंदे (वय 38, रा. राजीव गांधी नगर वसाहत, येरवडा) या दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. तर,मगरपट्टा येथील अपघातामध्ये एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

पुणे : शहरातील विश्रांतवाडी व मगरपट्टा या ठिकाणी अनोळखी वाहनचालकांनी भरधाव वाहन चालवित दोघांना उडविल्याने गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विश्रांतवाडी व हडपसर पोलिस ठाण्यात अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

"भीमा सहकारी साखर कारखान्याकडे १३५ कोटींची थकबाकी
 

विश्रांतवाडी येथे झालेल्या अपघातात प्रल्हाद पंढरीनाथ शिंदे (वय 38, रा. राजीव गांधी नगर वसाहत, येरवडा) या दुचाकीस्वाराचा मृत्यु झाला. याप्रकरणी अक्षय काळे (वय 23, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मामा प्रल्हाद शिंदे हे त्यांच्या दुचाकीवरुन विश्रांतवाडी येथील आळंदी सेवा रस्त्याने गुरूवारी दुपारी चार वाजता जात होते. ते फुलेनगर येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ आले, त्यावेळी त्यांना एका अनोळखी वाहनचालकाने वाहतुकीच्या नियमांचे दुर्लक्ष करुन भरधाव वाहन चालवित शिंदे यांच्या दुचाकीस पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने शिंदे यांचा मृत्यू झाला. 

"बारामतीतील ‘तो’ फ्लेक्‍स अखेर उतरविला

मगरपट्टा येथील अपघातामध्ये एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास मगरपट्टा येथील बी.जी.शिर्के कंपनीसमोरील रस्त्यावरुन जाणाऱ्या एका तरुणास अनोळखी भरधाव वाहनाने धडक दिली. त्यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघातांप्रकरणी हडपसर व विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात अनोळखी वाहनचालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भोसरीत एकतर्फी प्रेमातून तरुणीचा गळा चिरून खून
अजित पवारांच्या बंडामुळे पुण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये संभ्रम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two killed in accident at Vishrantwadi and Magarpatta