esakal | पावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाने कसली कंबर; राज्यातील ३००३ धरणांचा केला सर्व्हे!
sakal

बोलून बातमी शोधा

Dam_Maharashtra

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण केली आहे.​

पावसाळ्यापूर्वी जलसंपदा विभागाने कसली कंबर; राज्यातील ३००३ धरणांचा केला सर्व्हे!

sakal_logo
By
राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला (पुणे) : जलसंपदा विभागाने राज्यातील लहान मोठ्या तीन हजार तीन धरणांची पावसाळ्यापूर्वीची सुरक्षा तपासणी केली. यामध्ये पुण्यातील टेमघरसह राज्यातील सर्व धरणे पूर्णपणे सुरक्षित आहेत, अशी माहिती जलसंपदा लाभ क्षेत्र विभागाचे सचिव राजेंद्र पवार यांनी दिली.

- तलावांना 'रोहयो'चा 'आधार'; बेरोजगारांना रोजगार आणि शेतीला पुरेसे पाणी होणार उपलब्ध!

देशात मान्सून दाखल होणार असून पावसाळा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर यंदा राज्यातील जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वीची तयारी पूर्ण केली आहे. जलसंपदा विभागाच्या कोथरूड येथील जलसंपदा भवनमध्ये शुक्रवारी (ता.३०) झालेल्या पत्रकार परिषदेवेळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

- 'विद्यार्थ्यांसाठी कायपण'; राज्य सरकारचा 'हा' आहे नवा फंडा!

परिषदेतील मुद्दे : 

- पूर नियंत्रण कक्ष स्थापन करणे
तापी, कृष्णा, गोदावरी , कोकण, विदर्भ अंतर्गत खोरे निहाय व उपखोरे निहाय पूर नियंत्रण कक्ष १ जूनपासून २४x७ सुरू राहणार आहे.

- पूर नियंत्रक अधिकाऱ्यांची नेमणुक करणे
खोरे नियंत्रक अधिकारी व उपखोरे नियंत्रक अधिकारी, धरण नियंत्रक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

- महाराष्ट्रालगत असलेल्या राज्यात समन्वय साधणे 
आंतरराज्य प्रकल्पांसाठी संपर्कासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच, मंत्रालयात आपत्कालीन यंत्रणेचा कक्ष १ जूनपासून सुरु करण्यात येणार आहे. या कक्षातर्फे पाऊस, धरणासाठा, विसर्ग याची माहिती देण्यात येणार आहे.

 - Big Breaking : यंदाचा आषाढी वारी पायी दिंडी सोहळा रद्द

मान्सून पूर्वतयारी बैठका : 
- राज्य, प्रदेश, जिल्हा स्तरावर पूर्व तयारी बैठक झाली आहे.
- मागील वर्षी रेल्वे पुरात अडकली होती. त्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी रेल्वे बाधित प्रकल्पाच्या संदर्भात बैठक झाली.
- आंतरराज्य प्रकल्पाच्या संदर्भात बैठक २८ मे रोजी अतिरिक्त मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी तेलंगना, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.

जल शास्त्रीय निरीक्षण केंद्र :
- पर्जन्य मापक यंत्रे आणि नदी प्रवाह मापक यंत्रे यांची तपासणी करून ती कार्यान्वित केली आहेत.

- जिल्हाधिकारी ते छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री; जाणून घ्या अजित जोगी यांचा रंजक प्रवास!

धरण सुरक्षा तपासणी : 
- राज्यातील २०% धरणांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी तपासणी करण्यात आली आहे. धोकादायक परिस्थितीत असलेले एकही धरण नाही.
- सर्व द्वारयुक्त धरणांचा अद्ययावत प्रचलन आराखडा ROS व द्वार प्रचलन आराखडा GOS तयार करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा