पाणथळ क्षेत्रांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण

पाणथळ क्षेत्रांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण
Published on

पाणथळ क्षेत्रांना कायदेशीर संरक्षणाचा मार्ग मोकळा
१६ वर्षांनंतर काम पूर्णतेकडे; उपग्रहाने टिपलेल्या छायाचित्रांची मदत
ठाणे, ता. १९ (पीटीआय): राष्ट्रीय शाश्वत किनारी व्यवस्थापन केंद्राने (एनसीएससीएम) महाराष्ट्रातील २३,४१५ पाणथळ जागांपैकी ११ जागा वगळता इतर सर्व जागांची ''ग्राउंड-ट्रुथिंग'' म्हणजेच प्रत्यक्ष पडताळणी पूर्ण केली आहे. यामुळे या जागांना पाणथळ जागा (संवर्धन आणि व्यवस्थापन) नियमांनुसार कायदेशीर संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
ग्राउंड-ट्रुथिंगमध्ये उपग्रह प्रतिमांच्या आधारे पाणथळ जागांचे अस्तित्व, सीमा आणि सध्याचा भू-वापर यांची पुष्टी करण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण केले जाते. पर्यावरण कायद्यांतर्गत एखाद्या पाणथळ जागेला अधिकृतपणे अधिसूचित करण्यापूर्वी हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. महाराष्ट्र वेटलँड डॅशबोर्डनुसार उर्वरित ११ पाणथळ क्षेत्रे पुणे जिल्ह्यात असून त्यांची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत ठाण्यातील २४७, रायगडमधील १,०९३, मुंबई शहरातील ३७ आणि मुंबई उपनगरातील २१० पाणथळ क्षेत्रांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्यात सर्वाधिक १,५९६ पाणथळ क्षेत्रे अहिल्यानगर जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नाशिकमध्ये १,२३६ आणि चंद्रपूरमध्ये १,२३१ पाणथळ क्षेत्रे आहेत. नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी १६ वर्षांचा कालावधी लागणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, या विलंबामुळे उरण आणि मुंबई महानगर प्रदेशातील जैवविविधतेने समृद्ध पाणथळ क्षेत्रांचे नुकसान झाले आहे, असे ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पडताळणी केलेले नकाशे आता जिल्हा प्रशासन आणि स्टेट वेटलँड प्राधिकरणाकडे पाठवले जाणार असून त्यानंतर या क्षेत्रांना अधिकृत संरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune
Gyan Bharatam Project Aims to Protect and Digitize India’s Rich Manuscript Legacy
Environment Day: सायबेरियन पक्ष्यांचे नंदनवन अन् उत्तर प्रदेशातील १३ वे रामसर स्थळ! पाहा 'सुरहा ताल'चे काय आहे पर्यावरणीय महत्त्व!
Stunning Transformation Ahead as UP Lake Set for Global Tourism Development
Marathi News Esakal
www.esakal.com