Economic Recession: मंदीच्या धोक्याबाबत अमेरिकेच्या माजी अर्थमंत्र्यांनी दिला इशारा; म्हणाले, अर्थव्यवस्थेवर मंदी...

अमेरिकेच्या माजी अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
Economic Recession
Economic RecessionSakal

Economic Recession: अमेरिकेच्या माजी अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेबाबत मोठे वक्तव्य केले आहे. अमेरिकेत मंदीचा धोका वाढत असल्याचे लॉरेन्स समर्स यांनी म्हटले आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक चिन्हे याचे संकेत देत आहेत.

व्याजदरवाढीबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अमेरिकेत गेल्या वर्षी मार्चपासून व्याजदरात सातत्याने वाढ होत आहे.

याचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर झाला आहे. आर्थिक विकासाचा वेग मंदावला आहे, त्यामुळे मंदीचा धोका निर्माण झाला आहे. (Larry Summers Sees Higher Chance of Recession, Fed Nearing the End)

फेड शेवटच्या क्षणी व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेईल :

समर्स म्हणाले, "आपण व्याजदर वाढीच्या शेवटच्या चक्रात आहोत हे स्पष्ट झाले आहे. फेडरल रिझर्व्ह पुढे व्याजदर वाढवणार की नाही याचा निर्णय शेवटच्या क्षणी होईल." फेडरल रिझर्व्ह ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक आहे.

त्याचे पुढील आर्थिक धोरण 3 मे रोजी ठरणार आहे. समर्स म्हणाले की मार्चमधील नोकऱ्यांचा अहवाल अर्थव्यवस्थेतील ताकद दर्शवतो. पण पतधोरणावरील दबाव लक्षात घेता याचे महत्त्व कमी झाले आहे.

अमेरिकेतील बेरोजगारीचा दर 3.5 टक्क्यांपर्यंत खाली आल्याची माहिती ताज्या आकडेवारीतून देण्यात आली आहे.

Economic Recession
ICICI Bank Loan Fraud: सीबीआयने चंदा-दीपक कोचरवर केली कडक कारवाई, आरोपपत्र दाखल

फेडरल रिझर्व्हला स्वतःला काही प्रश्न विचारावे लागतात :

अमेरिकेचे माजी अर्थमंत्री म्हणाले की फेडरल रिझर्व्हने आपल्या अंतर्गत मॉडेलचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. यूएस मध्यवर्ती बँक महागाईचा अचूक अंदाज लावण्यात अपयशी ठरली.

2021 पासून महागाई वाढू लागली होती. तरीही सिलिकॉन व्हॅली बँक बुडण्यापासून वाचू शकली नाही. ते म्हणाले की फेडरल रिझर्व्हने आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. बँकेने स्वतःला काही प्रश्न विचारावे लागतील. गेल्या अडीच वर्षांत फेडरल रिझर्व्हची कामगिरी चांगली राहिलेली नाही.

Economic Recession
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com