Share Market
Share Market Sakal

Share Market Opening: कमकुवत जागतिक संकेतांमुळे बाजारात घसरण; सेन्सेक्स 65,400 च्या खाली, आयटी-मेटल शेअर्समध्ये विक्री

सेन्सेक्स 19 अंकांच्या घसरणीनंतर 65,400 च्या जवळ व्यवहार करत आहे.

Share Market Opening 6 July 2023: कमकुवत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजार घसरणीसह उघडला. सेन्सेक्स 19 अंकांच्या घसरणीनंतर 65,400 च्या जवळ व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे निफ्टी देखील 19400 च्या जवळ आहे. आयटी आणि मेटल शेअर्सच्या विक्रीमुळे बाजारावर दबाव आहे.

आयशर मोटर आणि टाटा स्टील निफ्टी सर्वाधिक तोट्यात आहेत, तर ब्रिटानिया 3% वर व्यवहार करत आहे.

Share Market Opening 6 July 2023
Share Market Opening 6 July 2023Sakal

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये घसरण:

आज बीएसई सेन्सेक्सच्या सुरुवातीच्या व्यवहारात टाटा स्टीलचे शेअर्स सर्वाधिक 0.84 टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत होते.

त्याचप्रमाणे इंडसइंड बँक 0.65 टक्क्यांनी, मारुती 0.57 टक्क्यांनी, टीसीएस 0.51 टक्क्यांनी, बजाज फायनान्स 0.46 टक्क्यांनी, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड 0.41 टक्क्यांनी आणि एचयूएल 0.41 टक्क्यांनी घसरले.

तर टायटन, टेक महिंद्रा, आयटीसी, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल आणि सन फार्मा घसरणीसह व्यवहार करत होते.

सेन्सेक्सवर 'या' शेअर्समध्ये तेजी:

पॉवर ग्रिड आज सेन्सेक्सवर 1.34 टक्क्यांच्या वाढीसह सर्वाधिक व्यवहार करत होता. त्याचप्रमाणे महिंद्रा अँड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंट्स, नेस्ले इंडिया, टाटा मोटर्स, रिलायन्स, लार्सन अँड टुब्रो, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक तेजीसह व्यवहार करत होते.

NSE IX वर, गिफ्ट निफ्टी 33 अंकांनी किंवा 0.17 टक्क्यांनी घसरून 19,479 अंकांवर व्यवहार करत होता. यावरून गुरुवारी दलाल स्ट्रीटचे सुरुवात नकारात्मक होऊ शकते, असे संकेत मिळत होते. प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स 60 अंकांनी घसरला, तर निफ्टी 19,390 अंकांच्या खाली गेला.

Share Market
GST: 49 दिवसांत 4,972 बनावट GST नोंदणी रद्द, 15,000 कोटींहून अधिक करचोरी पकडली

टोकियोचा शेअर बाजार घसरणीसह उघडला

फेड रिझर्व्हच्या बैठकीचे तपशील जाहीर झाल्यानंतर बुधवारच्या सत्रात वॉल स्ट्रीटमध्ये घसरण झाल्यामुळे टोकियोमधील शेअर बाजार आज घसरणीसह उघडला.

याचे कारण म्हणजे फेड रिझव्‍‌र्हच्या बैठकीचा तपशील असे सूचित करतो की, यूएस सेंट्रल बँक आगामी काळात व्याजदरात आणखी वाढ करू शकते. गुरुवारी सकाळी निक्केई 225 277.77 अंकांनी म्हणजेच 0.83 टक्क्यांनी घसरून 33,060.93 अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

Share Market
manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com