Share Market Opening: किंचीत घसरणीसह शेअर बाजार उघडला; आज 'या' शेअर्समध्ये वाढ

आज मारुती सुझुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारामध्ये अस्थिर परिस्थिती आहे.
Share Market
Share MarketSakal

Share Market Opening 26 April 2023: भारतीय शेअर बाजारांना आज जागतिक बाजारातून कोणताही पाठिंबा मिळत नाही आणि त्यामुळे शेअर बाजार सपाट उघडला आहे. आज मारुती सुझुकीच्या निकालापूर्वी शेअर बाजारामध्ये अस्थिर परिस्थिती आहे आणि याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर अर्ध्या टक्क्यांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे.

आज देशांतर्गत शेअर बाजाराची हालचाल खूपच मंद होती आणि निफ्टी जवळपास सपाट उघडला. BSE चा 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 42.73 अंकांच्या किंचित घसरणीसह 60,087.98 वर व्यवहार करत आहे.

याशिवाय, NSE चा निफ्टी केवळ 1.95 अंकांनी घसरून 17,767.30 च्या पातळीवर उघडला आहे आणि त्याने सपाट सुरुवात केली आहे. बाजाराच्या सुरुवातीला 780 शेअर्स तेजीसह व्यवहार करत होते आणि सुमारे 450 शेअर्समध्ये घसरण होत होती.

सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 16 शेअर्स तेजीसह तर 14 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. दुसरीकडे, निफ्टीच्या 50 पैकी केवळ 24 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत तर 26 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.

BSE India
BSE IndiaSakal
Share Market
Bank Holiday in May 2023: मे महिन्यात 'एवढ्या' दिवस बँका राहणार बंद; पहा सुट्ट्यांची यादी

'या' शेअर्समध्ये तेजी:

TCS, PowerGrid, IndusInd Bank, Tata Motors, M&M, L&T, Nestle, Wipro, HCL Tech, Bharti Airtel, Maruti Suzuki आणि Infosys या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज तेजीने व्यवहार होत आहे.

'या' शेअर्समध्ये घसरण:

अॅक्सिस बँक, टेक महिंद्रा, टायटन, भारती एअरटे, एचयूएल, एशियन पेंट्स, सन फार्मा, एचडीएफसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, एनटीपीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय आणि टाटा स्टील या शेअर्समध्ये घसरणीसह व्यवहार होताना दिसत आहे.

Share Market
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com