Share Market Opening: शेअर बाजाराची सकारात्मक सुरुवात; सेन्सेक्सने पार केला 73,900चा टप्पा, कोणते शेअर्स तेजीत?

Sensex-Nifty Today: शेअर बाजार बुधवारी वाढीसह उघडला. बाजाराला जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सने सुमारे 200 अंकांची उसळी घेतली आणि 73900 च्या वर व्यवहार करत होता.
Share Market Opening
Share Market OpeningSakal

Share Market Opening Latest Update 24 April 2024 (Marathi News):

शेअर बाजार बुधवारी वाढीसह उघडला. बाजाराला जागतिक संकेतांचा पाठिंबा मिळत आहे. बाजारातील प्रमुख निर्देशांक वाढीसह व्यवहार करत आहेत. सेन्सेक्सने सुमारे 200 अंकांची उसळी घेतली आणि 73900 च्या वर व्यवहार करत होता. निफ्टीही जवळपास 50 अंकांनी वाढून 22400 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. एफएमसीजी क्षेत्र वगळता सर्व बाजारपेठांमध्ये खरेदी होत आहे, ज्यामध्ये रिअल्टी क्षेत्र आघाडीवर आहे.

Sensex Today
Sensex TodaySakal

शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात निफ्टी एफएमसीजी निर्देशांक वगळता, सर्व क्षेत्रीय निर्देशांक वाढ नोंदवत होते. शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात वाढ झालेल्या शेअर्समध्ये नेस्ले इंडिया, सिप्ला, ॲक्सिस बँक, टाटा स्टील, बीपीसीएल, हीरो मोटोकॉर्प आणि कोल इंडिया या शेअर्सचा समावेश आहे.

तर सर्वाधिक नुकसान झालेल्या शेअर्समध्ये टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स, एचडीएफसी लाईफ, एसबीआय, इन्फोसिस, ब्रिटानिया, आयटीसी आणि पॉवर ग्रिड या शेअर्सचा समावेश आहे.

Share Market Opening
Loan Fraud: देशातील सर्वात मोठ्या फायनान्समध्ये 150 कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण?
Nifty Today
Nifty TodaySakal

सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती

बीएसई सेन्सेक्सच्या 30 शेअर्सपैकी 25 शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि फक्त 5 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. JSW स्टील 1.26 टक्के वाढीसह आघाडीवर आहे. टाटा स्टील 1.18 टक्के, नेस्ले 0.97 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 0.77 टक्के आणि टाटा मोटर्स 0.66 टक्के वाढले आहेत.

घसरलेल्या शेअर्समध्ये एचयूएल 0.48 टक्के, टायटन 0.28 टक्के आणि एशियन पेंट्स 0.27 टक्के घसरले होते. बजाज फायनान्स आणि एल अँड टी यांचे शेअर्स घसरताना दिसत आहेत.

S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

टेस्लाच्या घोषणेमुळे वॉल स्ट्रीटमध्ये तेजी

अमेरिकन शेअर बाजार वॉल स्ट्रीटमध्ये मंगळवारी झालेल्या वाढीमुळे बुधवारी आशियाई शेअर बाजारात तेजी होती. टेस्लाने नवीन मॉडेलची कार लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 83 डॉलरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या आहेत, यामुळे शेअर बाजारातील वाढीला मदत होईल अशी अपेक्षा आहे.

मध्यपूर्वेतील देशांमध्ये निर्माण झालेला तणाव हळूहळू शांत होत आहे. परकीय गुंतवणूकदारांची झपाट्याने विक्री होऊनही आणि चौथ्या तिमाहीचे निकाल अपेक्षेप्रमाणे नसतानाही, शेअर बाजारात तेजीची नोंद होत आहे.

Share Market Opening
Lok Sabha Election: 5,785 कोटींची मालमत्ता, पत्नीही कोट्यधीश; कोण आहेत लोकसभेचे सर्वात श्रीमंत उमेदवार?

बीएसईचे मार्केट कॅपिटलायझेशन

बीएसईचे बाजार भांडवल 401.45 लाख कोटी रुपये झाले असून त्यात 2860 शेअर्सचे व्यवहार होत आहेत. यापैकी 2174 शेअर्समध्ये वाढ होत आहे. 591 शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे आणि 95 शेअर्स कोणताही बदल न करता व्यवहार करत आहेत. 123 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 32 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com