दगडांच्या देशा : उद्योगवाढ व टिकविण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न हवे

K. C. Pande
K. C. Pandeesakal

२०१९ च्या अखेर पासून जग प्रचंड प्रमाणात बदलायला सुरुवात झाली. याचे मुख्य कारण म्हणजे या कालावधीत कोरोना महामारीचा प्रसार होण्यास सुरुवात झाली. संपूर्ण जगाचे चित्रच पालटून गेले.

२०२०पासून जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरला व संपूर्ण जगच निशब्द झाले की काय असे वाटायला लागले. मानवी जीवनामध्ये इतका मोठा बदल आतापर्यंत कधीही बघितलेला नव्हता. जगात लॉकडाऊन ही संकल्पना उदयास आली. (saptarang latest marathi article on Global efforts needed to grow and sustain industry by KC Pande nashik news)

अनेक महिने जवळपास वर्ष जग जागेवरच थांबले. उद्योगधंदे, विमाने, वाहतूकसेवा, कार्यालय हे सर्व बंद झाले करोडो लोकांचा रोजगार गेला.जवळपास सर्वच क्षेत्रांना याची झळ मोठ्या प्रमाणात बसली. यात पर्यटन व्यवसायाची सर्वात मोठी हानी झाली. जगात अनेक देश असे आहेत की त्यांची संपुर अर्थव्यवस्था ही पर्यटनाशी संबंधित व्यवसायांवर अवलंबून आहे.

संपूर्ण जगावर आर्थिक मंदीच छाया पसरली तीन वर्ष उलटूनही तरीही जग अजून सावरलेले नाही. परंपरागत काही उद्योगधंदे तर कायमचे बंद झाले. नवीन उद्योग सुरू झाले पण ज्या उद्योगांमधून जगाची ओळख निर्माण झाली. अशा उद्योगांना आजही प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे.याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कोरोनाचा संसर्ग.

चीनमधून प्रथम झाला आज २०२३ मध्ये सुद्धा चीन या समस्या पासून मुक्त होऊ शकलेला नाही. जगाच्या व्यापारामध्ये चीनचा जवळपास ३० टक्के वाटा आहे. हा सर्व क्षेत्रात आहे. त्यामुळे जर एवढी मोठी महासत्ता जर या मंदीच्या गर्केत अडकली असेल तर बाकीच्यांचं काय होणार. त्यात चीनमध्ये देशात काही बंधने नागरिकांवर आहेत.

त्यामुळे प्रशासनाच्या परवानगीशिवाय बाहेर काही येत नाही. सरकारच्या परवानगीशिवाय काहीच बाहेर पडत नाही गारगोटी सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचा उद्योग आम्ही इतक्या कष्टाने वाढवला जगाच्या पटलावर शिखरावर नेऊन पोहोचवला नाव रूपाला आला देशाचे नाव जगाच्या पाटलावर आले पण या उद्योगालाही अडचणीचा सामना करावा लागत आहे.

K. C. Pande
कुतूहलातून विज्ञानाकडे...

कारण याच सर्वात मोठे जे क्षेत्र आहे याची सर्वात मोठी बाजारपेठ आहे हे अमेरिकेतील तुसान व चीन येथे आहे. या दोन्ही महासत्ता अत्यंत अडचणीत आहे. उद्योगधंद्याच्या बाबतीत तर अनेक समस्या आहे. तुसान मध्ये जागतिक दर्जाचे मिनरल्स एक्झिबिशन होतात. नियमितपणे होत असतात.

त्यास हजारो लाखो नागरिक या एक्जीबिशनला नियमितपणे भेट देतात. पण अलीकडच्या काळात कोरोना महामारीनंतर जे मोजकेच एक्जीबिशन झाले त्यांना अगदी बोटावर मोजणे इतकेच लोकांची उपस्थिती होती. याहून आपल्याला उद्योग धंदे किती अडचणीत आहे, त्याची तीव्रता लक्षात येईल

भारत चीन अमेरिका या तिन्ही देशाने मिळून या उद्योगधंद्यासाठी च्या वाढीसाठी काही सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. यात प्रामुख्याने ट्रॅव्हल पॉलिसी व ट्रान्सपोर्टेशन हे सर्वात महत्त्वाचे आहे. लोकांच्या मनातून कोरोना बद्दलची भीती घालवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अजून पावली उचलण्याची गरज आहे.

या सर्वात मोठी अडचण आहे. या क्षेत्रातील जे गुंतवणूकदार आहे, यांचा असंख्य मिनरलचा साठा हा चीन मध्ये पडून आहे. जर तीन वर्षापासून आपल्या उत्पादना एखाद्या ठिकाणी जर पडून असेल तर किती अडचण निर्माण होऊ शकते हे आपणास लक्षात येईल. त्यांना तो बाहेर मागवता येत नाही आहे.

कारण तीन चार वर्षांपूर्वी खरेदी केलेले उत्पादन त्यासाठी उभे करावा लागणारे भांडवल व त्या वस्तू विकताही येत नाही त्यामुळे आर्थिक अडचणीचा प्रचंड प्रमाणात सामना करावा लागत आहे. यामधून मार्ग निघाला पाहिजे.

भारत अमेरिका व चीन तिन्ही देशांनी समन्वय साधून यावर काही निर्णय घेण्याची गरज आहे. यासाठी काही सबसिडी अथवा काही आर्थिक सवलती देता येईल का? याबद्दल गांभीर्याने तिन्ही देशांनी विचार करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

K. C. Pande
संकटग्रस्त पाणवठे

जगातील तीन मोठ्या अर्थव्यवस्थांना यंदा आर्थिक मंदीचा फटका बसण्याचा धोका असल्याचे अंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांन म्हटले आहे. त्यांनी इशारा दिला आहे की, २०२३ हे वर्ष चीन, अमेरिका आणि युरोपीयन राष्ट्रांसाठी अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने गेल्या वर्षीपेक्षा अधिक खडतर असेल. या देशांच्या अर्थव्यवस्थेचा आलेख यावर्षी खाली घसरेल असे त्यांनी म्हटले आहे.

युक्रेनमध्ये गेल्या १० महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष,वाढती महागाई,दिवसेंदिवस वाढत असलेले व्याजदर आणि चीनमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूचा वाढता संसर्ग या पार्श्वभूमीवर क्रिस्टालिना जॉर्जिव्हा यांनी ही भीती व्यक्त केली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या जगातील एक तृतीयांश अर्थव्यवस्थेला यंदा मंदीचा सामना करावा लागणार आहे.

गतवर्षापेक्षा यंदा अमेरिका, युरोप आणि चीनला आर्थिक मंदीचा फटका बसण्याचा धोका आहे. ज्या देशात आर्थिक मंदी नसेल त्या देशातील नागरिकांना देखील आर्थिक मंदी असल्यासारखे वाटेल अशी मंदी सदृश्य परिस्थिती उद्भवू शकते.

कोरोना महामारीच्या संकटातून काहीसे सावरणे सुरु असतानाच आता पुन्हा एकदा जगावर मंदीचे ढग निर्माण होत आहेत. याचा नकारात्मक परिणाम म्हणून जगातील प्रमुख आयटी कंपन्या चिंतेत असल्याचे दिसून येत आहे. सदरच्या कंपन्या या मागील पाच ते सहा महिन्यांपासून पूर्णपणे संकटातून प्रवास करत असल्याची माहिती आहे.

K. C. Pande
ऐका सांगावा हवामान बदलाचा

याचदरम्यान दिग्गज कंपन्यांमध्ये गुगल,ऍमेझॉन,ऍपल,फेसबुक, मायक्रोसॉफ्ट,नेटफ्लिक्स आणि टेस्ला यांच्यासह आयटी क्षेत्रातील प्रमुख कंपन्या मंदीचा सामना सहन करत असून यामधून सावरण्यासाठी या कंपन्या प्रयत्न करत आहे.

अगदी काही दिवसांपूर्वीच हजारो कर्मचाऱ्यांना या प्रसिद्ध कंपन्यांनी अचानक कामावरून काढून टाकले. आपली आर्थिक घडी विस्कटून जाऊ नये म्हणून या कंपन्यांनी कर्मचाऱयांची कपात केली असे सांगण्यात आले.

सध्या आपल्या देशाची वाटचाल नियम आणि नियंत्रण याकडून सुरू आहे.कोविड-१९ चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम अजूनही तीव्रपणे जाणवत आहे.

२०१९ च्या वर्षअखेरीपासूनच आर्थिक कोंडीचा सामना करावा लागत असलेल्या पुन्हा भारतात कोरोना संदर्भात काही निर्बंध लादल्यास व ती एक महिन्याहून अधिक काळ सुरू राहिल्यास कष्टकरी लोकांवर आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे.

वस्तू व सेवांचे उत्पादन आणि पुरवठा संपूर्णपणे ठप्प नसला तरी विस्कळीत या मागील काळामुळे होत आहे. विद्यमान मागणीच्या तुलनेत वस्तू आणि सेवा पुरेशा प्रमाणात पुरवल्या जात नाहीत. त्याच वेळी,आर्थिक युनिट्स बंद झाल्यामुळे लोक आपली नोकरी व मजुरी गमावतात.

उत्पन्न व महागाईचे प्रमाण यामध्ये प्रचंड तफावत असल्यामुळे वस्तू खरेदी मंदावल्याने एकूण मागणीवरही विपरित परिणाम होतो. अलीकडच्या काळातील जागतिक अर्थव्यवस्थेमधील मंदीसदृश परिस्थिती ही एकतर खालावलेली मागणी अथवा अचानक घडून आलेले पुरवठ्यातील बदल किंवा आर्थिक संकट यामुळे उद्भवलेली आहे.

K. C. Pande
न्यायनिवाड्याचा 'रोबो' प्रयोग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com