esakal | काशीळनजीक बसचा अपघात; कोल्हापूर, धुळे, मलकापूरातील प्रवासी जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

काशीळनजीक बसचा अपघात; कोल्हापूर, धुळे, मलकापूरातील प्रवासी जखमी

या अपघाताचा पुढील तपास हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम करत आहेत.

काशीळनजीक बसचा अपघात; कोल्हापूर, धुळे, मलकापूरातील प्रवासी जखमी

sakal_logo
By
विकास जाधव

काशीळ (जि. सातारा) : येथील शिवराजनगर येथे बंद पडलेल्या एसटी बसला पाठीमागून आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वाहकासह नऊ प्रवासी जखमी झाले. याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सांगली आगाराची सातारा ते सांगली जाणारी बस गुरुवारी (ता.७) महामार्गावर काशीळ येथे बंद पडल्याने चालकाने बस महामार्गालगत बाजूला उभी केली होती. या नादुरुस्त बसला पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुसऱ्या एसटी बसने धडक दिली.

या अपघाताची फिर्याद प्रकाश तुकाराम डिसले (सांगली आगार बसचालक, रा. वसगडे, ता. पलूस) यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. या अपघातात स्वारगेट- कोल्हापूर बसचा वाहक दगडू वसंत मुगदल (वय 52, रा. वडनगे, ता. करवीर. जि. कोल्हापूर) यांच्यासह त्यातील प्रवासी शुभम दगडू मुगदल (वय 20), वैशाली दगडू मुगदल (वय 44, दोघे रा. वडगणे, ता. करवीर, जि. कोल्हापूर), संदीप कागले (वय 48), तुषार संतोष कागले (वय 21), कोमल संतोष कागले (वय 23), शारदा संतोष कागले (वय, 47), आदित्य संतोष कागले (वय 17, सर्व रा. सेवाधामनगर चिथोड, जि. धुळे), संगीता संतोष पोतदार (वय 38, रा. मलकापूर) हे गंभीर व किरकोळ जखमी झाले. 

पुणे - बंगळूर महामार्गावर बिबट्याचे ठाण; अर्धा तास खाेळंबली वाहतुक 

काय सांगता! सातारा ते कागल महामार्गावर बनणार सर्वाधिक लांबीचा उड्डाण पूल 

अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक डॉ. सागर वाघ, हवालदार सुनील जाधव, मनोहर सुर्वे, किरण निकम यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णवाहिकेने उपचारासाठी कऱ्हाड येथे पाठवले. अपघाताची नोंद बोरगाव पोलिस ठाण्यात झाली असून, स्वारगेट- कोल्हापूर बस चालक अजित मारुती पाटील (रा. तिटवे, राधानगरी, कोल्हापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार मनोहर सुर्वे व किरण निकम करत आहेत.

राज्यातील अनेक भागात येत्या 48 तासांत अवकाळी पावसाचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

loading image