esakal | अग्निशामक दलास आग विझविण्यात यश; साडेचार कोटींचे नुकसान

बोलून बातमी शोधा

Fire-Brigade
अग्निशामक दलास आग विझविण्यात यश; साडेचार कोटींचे नुकसान
sakal_logo
By
राजेंद्र ननावरे, हेमंत पवार

मलकापूर (जि. सातारा) : येथील लोटस फर्निचरच्या शोरूमला गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक आग लागली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग विझविण्यात अग्निशामक दलाला यश आले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, साहित्याचे सुमारे साडेचार कोटींचे नुकसान झाले. नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने ती पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.

पुणे- बंगळूर महामार्गालगत मलकापूर येथे मुकेश माने, अनिरुद्ध तवटे व तानाजी जाधवांच्या मालकीचे लोटस फर्निचरचे शोरूम आहे. सध्या लॉकडाउनमुळे ते बंद होते. दुपारी एकच्या सुमारास शोरूमच्या पाठीमागील बाजूने अचानक धुराचे लोट बाहेर येऊ लागले. त्यामुळे नागरिकांच्या शोरूमला आग लागल्याचे निदर्शनास आले. त्याची माहिती नागरिकांनी पोलिस, मलकापूर पालिकेला दिली. पोलिसांनी कऱ्हाड पालिका, कृष्णा हॉस्पिटल व कृष्णा कारखान्याच्या अग्निशमन दलाच्या गाड्या पाचारण केल्या. वारेही असल्याने काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग विझविण्यास शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, आग मोठी असल्याने ती लगेच आटोक्‍यात आली नाही.

वन विभागाच्या कॅमेऱ्यात वाघाची छबी; तब्बल तीन वर्षांनंतर 'सह्याद्री'त पट्टेरी वाघाचे दर्शन

दरम्यान, पाणी संपल्याने मलकापूर पालिकेने चोवीस तास योजनेचे पाणी अग्निश्‍मन दलाला उपलब्ध करून दिले. आग लवकर आटोक्‍यात येणार नाही, हे लक्षात येताच काही नागरिकांनी जेसीबीच्या साह्याने शोरूमचे दोन भाग करण्याचे प्रयत्न केले. शोरूमची भिंत तोडून आगीपासून उर्वरित शोरूम वाचवण्याचे प्रयत्न केले. तोडलेल्या भिंतीवरून कर्मचाऱ्यांनी आत जाऊन पाण्याचे फवारे मारले. दरम्यान, शोरूमधील फर्निचरचा साठा मोठ्या प्रमाणावर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. अग्निशामन दलाने तीन तास प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आणली. घटनास्थळी पालिकेचे मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह अधिकारी- कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अजित थोरात यांनी युवकांच्या मदतीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान घटनास्थळी गर्दी झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून गर्दी पांगवली.

सातारकरांनाे! काळजी घ्या, घाबरु नका; आलाय नवा आदेश

अरं बाबा, काेण म्हणतं फुकट हाय; 200 रुपये जात्यात लशीसाठी

बेड मिळाला नाही, म्हणून खचून न जाता कोरोनाशी लढणार; काटेवाडीच्या कोरोनाग्रस्तांचा निर्धार

'मला कोरोना झाला अन् तब्बल चार तास माझे पती बेडसाठी वणवण हिंडत राहिले'

Edited By : Siddharth Latkar