esakal | रेशन दुकानदारांचा संप येत्या दोन दिवसांत मिटेल? माेफत धान्य वाटपाचा तिढा सुटेल

बोलून बातमी शोधा

ration

रेशन दुकानदारांचा संप येत्या दोन दिवसांत मिटेल?

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : कोरोनाच्या Coronavirus दुसऱ्या लाटेत सर्व काही बंद असल्याने हातावर पोट असलेल्यांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनाच दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मोफत तांदूळ व गहू देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शासनाकडून धान्याचा कोटा जिल्ह्यात उपलब्ध झाला आहे. केंद्राकडून मिळालेले धान्य दोन महिने मोफत असेल. पण, रेशन दुकानदारांचा संप असल्याने हे मोफत धान्य वाटपात अडचण येत आहे. येत्या दोन दिवसांत संप मिटेल, त्यामुळे तातडीने धान्यवाटप सुरू होईल, असा विश्‍वास पुरवठा विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये शासनाने सर्वसामान्यांना सवलतीच्या दरात तर गरिबांना मोफत धान्यवाटप केले होते. परिणामी, लॉकडाउनच्या काळात जनतेला दिलासा मिळाला. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक सेवा वगळता सर्व काही बंद केले आहे. या बंदच्या काळात सर्वसामान्य जनतेसह व हातावर पोट असलेल्या गोरगरिबांना दिलासा देण्यासाठी शासनाने यावेळेस लॉकडाउनच्या काळात मोफत धान्य वाटपाचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये प्रति व्यक्तीला तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे. त्यासाठी लागणारा धान्याचा कोटा जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. पुरवठा विभागाकडून हे धान्य तालुकानिहाय वाटप करण्याचे काम सुरू आहे. (Ration Shopkeepers Strike Satara Marathi News)

कोरोनाच्या साथीत गरज पडेल, तिथे 'माणदेशी'कडून मदत करू; प्रभात सिन्हांचे आश्वासन

हे धान्य सर्व लाभार्थ्यांना मोफत आहे. पण, सध्या कोरोना काळातील सुरक्षिततेसंदर्भात विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा संप सुरू आहे. या संपामुळे रेशन दुकानापर्यंत धान्य पोचूनही वाटप सुरू झालेले नाही. येत्या दोन दिवसांत संप मिटेल, त्यामुळे मोफत धान्याचे वाटप या दुकानांतून सुरू होईल, असा विश्‍वास पुरवठा विभागातून व्यक्त होत आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून धान्य उपलब्ध

जिल्ह्याला उपलब्ध कोट्यामध्ये प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतून 4,320 मेट्रिक टन गहू, 2,609 मेट्रिक टन तांदूळ, अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांसाठी 402 मेट्रिक टन गहू व 269 मेट्रिक टन तांदूळ उपलब्ध झाला आहे. तेवढाच कोटा राज्य सरकारकडूनही उपलब्ध झाला आहे. केंद्राकडून मिळालेल्या कोट्यातून मे, जून असे दोन महिने हे मोफत धान्यवाटप होणार आहे. तर राज्य सरकारच्या कोट्यातून एक महिन्याचे धान्य दिले जाणार आहे.

आता कसं हाेणार? अनिल अंबानींपुढे निर्माण झालाय पेच

पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना सक्त आदेश; साताऱ्यात कडक Lockdown, सर्व दुकाने बंद!

Edited By : Siddharth Latkar