विराेधी पक्ष नेते अशोक मोनेंवर बरसल्या नगराध्यक्षा माधवी कदम

विराेधी पक्ष नेते अशोक मोनेंवर बरसल्या नगराध्यक्षा माधवी कदम

सातारा : बाजार समितीत सचिव पदावरील मनवे नामक व्यक्‍तीला लाचखोरीच्या आरोपात अटक झाली होती. त्या वेळी तत्कालीन सभापतींचा नगरसेवक मोने यांनी राजीनामा का मागीतला नाही. त्यामुळे आज माझा राजीनामा मागण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. मात्र, आपला तो बाबल्या आणि दुसऱ्याचे ते कार्ट अशी दुटप्पी भूमिका असलेल्या अशोक मोने यांनी स्वत: नगरसेवकपदाचा राजीनामा द्यावा. मग माझ्या राजीनाम्याबाबत वाच्यता करावी, असे प्रतिउत्तर नगराध्यक्षा माधवी कदम यांनी नगरसेवक अशोक मोने यांना दिले आहे.
उदयनराजे... सातारकरांच्या विश्‍वासाला तडा जातोय!
 
याबाबत नगराध्यक्षा कदम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले, की वास्तविक एक चांगले व्यक्तिमत्त्व म्हणून मोने यांना ओळखते. नगरपालिकेच्या कामकाजात आम्ही सर्व नगरसेवक नेहमीच अशोक मोने आणि त्यांच्या सहकारी नगरसेवकांशी विचारविमर्श करीत असतो. अशातच अशोक मोनेंनी मला गांधारीची उपमा दिली. महाभारतातील गांधारीने तिचा राजा असलेला पती अंध होता म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली होती. आज माझे पती ना राजा आहेत, ना अंध आहेत. त्यामुळे ही उपमा मला लागू होत नाही. त्यांना कदाचित दुसऱ्यांविषयी बोलायचे असेल; पण ते बोलता येत नसेल म्हणून त्यांनी उचलली जीभ लावली टाळ्याला, असा खटाटोप केल्याचे दिसत आहे. मुळात गांधारीची उपमा तुम्हालाच लागू होते. सातारकरांच्या हिताचा तुम्हास कधीही न जमलेला विकास उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडीने केला आहे. तो डोळ्यावर पट्टी बांधल्याने तुम्हाला दिसत नाही. त्यामुळे गांधारी कोण हे जनतेला सांगायची आवश्‍यकता नाही.''
 
सातारकरांत तीन क्‍लिपा व्हायरल झाल्या आहेत, असे मोने सांगत आहेत. मोने यांनी माझ्याबाबतीत किंवा आमच्या आघाडीच्या बाबतीतील तथाकथित तीन क्‍लिप सिद्ध करून दाखवावी, मगच त्याबाबत मतप्रदर्शन करावे. उगाच हवेत गोळ्या मारून स्वत: हिरो असल्यासारखा बालिशपणा दाखवू नये. खासदार उदयनराजे भोसले यांनी भ्रष्टाचाराला कधीच खतपाणी घातलेले नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात कुणाचाही मुलाहिजा न ठेवता भ्रष्टाचाराला थारा दिला जाणार नाही. सातारकरांच्या विश्‍वासाला कदापिही तडा जाणार नाही, असेही कदम यांनी नमूद केले.

नगराध्यक्षा गांधारी : कलंक पुसण्यासाठी राजीनामा द्यावा : अशाेक माेने कडाडले

सातारा पालिकेतील लाचखोरांवर कठोर कारवाई करा : माधवी कदम

पैशाच्या हव्यासापोटी लग्नाच्या बेडीऐवजी पोलिस कोठडीची जोडी

लोकाभिमुख कारभार करा; नगरविकास आघाडीच्या सत्ताधाऱ्यांना कानपिचक्या

लाच घेताना उपमुख्याधिकारी धुमाळ जाळ्यात; कायंगुडे, यादव, टोपेंवरही गुन्हा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com