काय सांगता! चाेरांनी एसपी कार्यालय परिसरातच साधला डाव

प्रवीण जाधव
Wednesday, 27 January 2021

गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर आणि उपनगरांमध्ये चाे-यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपुर्वी साेनसाखळी चाेरताना काही युवक यादाेगाेपाळ पेठेतील सीसीटीव्हत कैद झाले हाेते. पाेलिस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

सातारा : पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेली आहे. याबाबत अनिल तात्याबा चव्हाण (रा. वेळे कामथी, ता. सातारा) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सातारा शहर आणि उपनगरांमध्ये चाे-यांचे प्रमाण वाढले आहे. काही दिवसांपुर्वी साेनसाखळी चाेरताना काही युवक यादाेगाेपाळ पेठेतील सीसीटीव्हत कैद झाले हाेते. पाेलिस प्रशासनाने गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.

बुधवारी (ता. 13) रात्री अनिल चव्हाण यांनी पाेलिस अधीक्षक कार्यालाच्या परिसरात दुचाकी लावली होती. गुरुवारी सकाळी त्यांची दुचाकी त्या ठिकाणी आढळली नाही. याबाबतची फिर्याद त्यांनी नुकतीच दिली. या चाेरीचा तपास हवालदार पवार करत आहेत.

वेताळवाडीत ट्रॅक्‍टर चालक जागीच ठार

मल्हारपेठ : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरवरील ताबा सुटून झालेल्या अपघातात वेताळवाडी (नावडी) येथील चालक जागीच ठार झाला. मारूल-पापर्डे दरम्यान भरळी नावाच्या घाटात सोमवारी सव्वापाचच्या सुमारास घटना घडली.
 
अमोल वाल्मिक कदम (वय 30) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. अमोल स्वतः ट्रॅक्‍टर मालक असून तेच ट्रॅक्‍टर चालवत होते. सोमवारी सायंकाळच्या सुमारास उसाने भरलेला दोन ट्रालीसह ट्रॅक्‍टर घेऊन ते मरळीच्या दिशेने चालले होते. मारूल-पापर्डे दरम्यान असलेल्या भरळीच्या घाटातून जाताना उतारावर त्यांचा ट्रॅक्‍टरवरील ताबा सुटला.

मराठा समाजाला न्याय मिळाला नाही, तर मी दुसऱ्या दिवशीचा सूर्योदय पाहणार नाही

त्यामुळे ट्रॅक्‍टर ट्रॉलीसहीत रस्त्याच्या शेजारील चरीत जाऊन पलटी झाला. अमोल बाहेर फेकले जाऊन त्यांच्या अंगावर ऊस पडल्याने ते उसाखाली दबले गेले. दरम्यान, रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी घटना पाहिल्यानंतर परिसरातील नागरिकांना मदतीसाठी बोलावले. माहिती समजताच वेताळवाडी, सोनाईचीवाडी, मारूल हवेली गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. ऊस बाजूला करून अमोल यांना बाहेर काढले. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले. परंतु, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. 

Republic Day 2021 : शासनाचे पाठबळ, प्रशासनाचे धैर्य, सातारकरांच्या संयमामुळेच करुन दाखवलं : बाऴासाहेब पाटील

तेलेवाडीत आगीत लाखोंची हानी 

मल्हारपेठ : चालू गॅसच्या रेग्युलेटरने अचानक पेट घेतल्याने तेलेवाडी-नवारस्ता येथील हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना रविवारी घडली. आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. 
नवारस्ता परिसरातील पांढरवाडीलगत रणजित संजय कांबळे यांच्या मालकीचे हॉटेल कृष्णानंदन कऱ्हाड-चिपळूण नव्या महामार्गावर आहे.

हॉटेल रात्रंदिवस ग्राहकांच्या सेवेत असल्यामुळे हॉटेलमध्ये नेहमीच गर्दी असते. रविवारी सुटीचा दिवस असल्याने नेहमीपेक्षा जास्त गर्दी होती. मात्र, सायंकाळी अचानक हॉटेलच्या किचनमधील गॅसच्या रेग्युलेटरमधून आगीच्या ज्वाळा सुरू झाल्या. त्यानंतर आगीचा मोठा भडका उडाला. आगीने क्षणातच रौद्ररूप धारण केले. यामध्ये किचनमधील फ्रीजसहित लाकडी बाके, टेबल, काउंटर, कपाटे असे लाखो रुपयांचे साहित्य आगीत खाक झाले.

तुमच्या मदतीशिवाय तीरा तिचा दुसरा वाढदिवस साजरा करू शकणार नाही, काळजाचा ठोका चुकवणारी बातमी ​

बंदूक चालविणाऱ्या हाती जेव्हा कुंचला येतो! जवान प्रदीप चव्हाणांच्या चित्रांचे देशभर प्रदर्शन

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Theft In Satara Police Superintendent Office Satara Crime News