#ManOnMoon50th : चंद्रावरच्या पहिल्या पावलाला गुगल डूडलची सलामी

apollo-11-mission.jpg
apollo-11-mission.jpg

आजपासून 50 वर्षांपूर्वी, नासाचे अपोलो 11 मिशन पूर्ण झाले. इतिहासात प्रथमच मानवाने यशस्वीरित्या चंद्राच्या पृष्ठभागावर पहिले पाऊल ठेवले होते. या मोहिमेचा प्रवास आणि 'तो' क्षण गुगलने डुडल मार्फत रेखाटला आहे.

20 जुलै 1969 मध्ये मानवाने चंद्रावर पहिलं पाऊल ठेऊन इतिहास घडवला! अंतराळवीर चंद्रावर उतरले आणि पुन्हा सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. मानवाच्या यशाचा तो अविस्मरणीय क्षण आज व्हिडिओ स्वरूपात डुडलमार्फत गुगलने साजरा केला. या व्हिडिओला माजी अंतराळवीर आणि अपोलो 11 कमांड मॉड्यूल पायलट मायकल कॉलिन्स यांना व्हाईस ओव्हर दिला असून त्यांनी प्रवासाचे वर्णन केले आहे. 

तब्बल 40000 जणांची टीम नासाच्या अपोलो 11 मिशनसाठी दिवस रात्र  कार्यरत होती. नील ए. आर्मस्ट्राँग, बझ आल्ड्रिन, मायकल कॉलिन्स यांना या चंद्रावर जाण्यासाठी निवडण्यात आले होते. या व्हिडिओ मध्ये 'इगल' चा उड्डान, त्याचा अंतराळतील प्रवास, चंद्रावर मानवाचे पहिले पाऊल असा प्रवास डुडल मार्फत रेखाटला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com