IPhone Issues : बॅटरी प्रॉब्लेम ते अ‍ॅप क्रॅश, आयफोन वापरणाऱ्यांना टेन्शन देणाऱ्या समस्यांवर रामबाण उपाय

आयफोन हा एक प्रीमियम फोन आहे
IPhone Issues
IPhone Issuesesakal

IPhone Issues : आयफोन हा प्रिमियम फोन असला तरी याचा अर्थ अॅपल आयफोनला काही प्रॉब्लम्स येत नाहीत असं नाही. या बातमीत आम्ही आयफोनचे काही प्रॉब्लम्स आणि त्यांचे उपाय सांगितले आहेत.

आयफोन हा एक प्रीमियम फोन आहे. साहजिकच त्याची किंमत खूप जास्त आहे, परंतु यामध्ये देखील युजर्सना प्रॉब्लम्सचा सामना करावा लागतो. पण हे प्रॉब्लम्स देखील सोडवले जाऊ शकतात. काही युजर्स बॅटरी लवकर संपते अशी तक्रार करतात तर काहींना स्लो इंटरफेसमुळे त्रास होतो. येथे आपण आयफोनचे काही कॉमन प्रॉब्लम्स आणि त्यांचे निराकरण कसे कराल याची माहिती घेऊ.

IPhone Issues
Health Care News: तुम्हीही रोज शेपवेअर वापरताय? होऊ शकतात हे गंभीर परिणाम, जाणून घ्या

1. हाय बॅटरी कंजम्पशन

आयफोनबाबत युजर्सची सर्वात मोठी तक्रार म्हणजे बॅटरी लवकर संपते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, बॅकग्राउंड अॅप रिफ्रेशचा पर्याय बंद करा. यामुळे बॅकग्राउंडमध्ये चालणारे अॅप्स डेटा वापरणार नाहीत आणि बॅटरीची कार्यक्षमता चांगली राहील. तुम्हाला हा पर्याय आयफोनच्या सेटिंग्जमध्ये जनरल या ऑप्शन मध्ये दिसेल. याशिवाय, कोणते अॅप सर्वाधिक बॅटरी वापरत आहे हे पाहण्यासाठी तुम्ही सर्वसाधारणपणे बॅटरीचा युज कुठे होतो हे सेटिंग मध्ये जाऊन तपासू शकता.

IPhone Issues
Health Tips.....या एका मसाल्यामुळे मूळव्याधीच्या समस्या होतील कमी, असं करा सेवन

2. स्लो इंटरफेस

जर तुमचा आयफोन आणि आयपॅड स्लो झाला असेल तर जनरल ऑप्शन वर जा आणि सेटिंग्ज वर क्लिक करा. येथे स्टोरेज मॅनेज करा. यामुळे आयफोनमधील लॅग दूर होईल. जर तो स्लो होत असेल तर, नको असलेले अॅप्स हटवा आणि तुम्ही तुमचा फोन डेटा क्लाउडवर ठेवल्यास टनअधिक चांगल्या पद्धतीने काम करेल. जर तुम्ही पॅरालॅक्स वॉलपेपर ऑन केले असेल तर ते ही बंद करा.

IPhone Issues
Health Care News: चटकदार लोणचं चवीने खाताय तर थांबा! या गंभीर आजारांचा करावा लागेल सामना

3. कनेक्टिव्हिटी प्रॉब्लेम

आयफोन मध्ये लोकांना अनेकदा कनेक्टिव्हिटीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. काही आयफोन मध्ये वायफाय कनेक्ट केलेले नसते तर काही फोन मध्ये ब्लूटूथ कनेक्ट नसते. अशा स्थितीत, तुमचा फोन 30 सेकंदांसाठी एअरप्लेन मोडमध्ये ठेवा आणि नंतर फोन चालू करा आणि कनेक्ट करा. यानंतरही समस्या येत राहिल्यास, सेटिंग्जमध्ये जा आणि एकदा नेटवर्क रीसेट करा.

IPhone Issues
Health Care News: जेवल्यानंतर पोटात सतत जळजळ होतेय? मग हे घरगुती उपाय करून पाहा

4. iMessaging फेल

ऍपल युजर्सना iMessaging वापरताना मॅसेज पाठवताना अडचणी येतात. जर तुम्ही इंटरनेट किंवा वायफाय वापरत असाल आणि तरीही iMessage मध्ये मेसेज फेल होण्याची समस्या दिसत असेल तर ती रीसेट करा. समस्या अजूनही कायम राहिल्यास, तुमचा iPhone एकदा रीस्टार्ट करा.

IPhone Issues
Health Care News: जेवल्यानंतर पोटात सतत जळजळ होतेय? मग हे घरगुती उपाय करून पाहा

5. सिंक मध्ये येणाऱ्या अडचणी

जर तुम्हाला सिंकमध्ये समस्या येत असेल, तर सर्वप्रथम इंटरनेट व्यवस्थित काम करत आहे की नाही ते तपासा. जर इंटरनेट नीट काम करत असेल तर तुमचा आयफोन अपडेट आहे की नाही ते तपासा. जर सर्व काही ठीक असेल परंतु तरीही समस्या येत असेल तर तुमचे Apple अकाउंट काढून टाका. नंतर फोन रीस्टार्ट करा.

IPhone Issues
Vastu Tips : वास्तूनूसार घरात कोणत्या दिशेला कोणती झाडे लावावीत?

6. अॅप क्रॅश

तुमच्या आयफोनमध्ये अॅप वारंवार क्रॅश होत असेल तर ते सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे असू शकते. अशा वेळी, सॉफ्टवेअर अपडेट करा आणि तरीही ते क्रॅश झाल्यास, त्या अॅपला रिपोर्ट मारा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com