Self-verification फीचर लॉन्च करणारा 'Koo' ठरला जगातला सर्वात पहिला प्लॅटफॉर्म | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Koo app

Self-verification फीचर लॉन्च करणारा 'Koo' ठरला जगातला सर्वात पहिला प्लॅटफॉर्म

देशाचा पहिला बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म Koo App (कू ऐप) ने ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशन फीचर लॉन्च करुन कू जगातला सर्वात पहिला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बनला आहे. याच्या साहाय्याने कुणीही युजर आता शासनाने अधिकृत मंजूरी दिलेले ओळखपत्र वापरून अगदी काही क्षणात स्वत:ला सेल्फ व्हेरिफाय करू शकतो. यातून युजर्स आपल्या खात्याची ओळख सिद्ध करण्यास सक्षम बनतो सोबतच युजर्सनी शेअर केलेले विचार आणि मतंही यातून विश्वासार्ह बनतात.

या फीचरच्या माध्यमातून यूजर्स सरकारी ओळखपत्राचा क्रमांक 'कू'वर भरतात. त्यानंतर फोनवर आलेला ओटीपी टाकतात आणि यशस्वी प्रमाणिकरण झाल्यावर त्यांच्या प्रोफाइल्स हिरव्या रंगाच्या टिकसह सेल्फ-वेरिफाई होतात. ही सगळी प्रक्रिया अगदी काही क्षणातच पूर्ण होते. विशेष म्हणजे ही सगळी प्रक्रिया सरकारद्वारे, अधिकृत थर्डपार्टी द्वारे केली जाते. या प्रक्रियेदरम्यान Koo App यासंबंधीची कुठलीच माहिती स्वत:कडे जमा करत नाही.

या प्लॅटफॉर्मवर यूजर्सना सशक्त बनवण्यासह प्रामाणिकतेला प्रोत्साहन देण्याचा पर्यत्न केला गेला आहे. ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशनच्या माध्यमातून ऑनलाइनवर चुकीची माहिती, अभद्र भाषा, चुकीचे वर्तन आणि फसवणुकीला आळा बसणार, हे निश्चित आहे.

हेही वाचा: Google Map Update : प्रवासादरम्यान मिळणार टोल टॅक्स रकमेची माहिती

या विषयी बोलताना Koo App चे सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण म्हणाले, “सोशल मीडियावर विश्वास आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देण्यात Koo App सर्वात पुढे आहे. ऐच्छिक सेल्फ-वेरिफिकेशन प्रणाली सुरू करणारा जगातला पहिला प्लॅटफॉर्म म्हणवून घेताना आम्हाला अभिमान वाटतोय.

यूजर्स आमच्या सुरक्षित पडताळणी प्रक्रियेच्या माध्यमातून काही सेकंदातच सेल्फ-वेरिफिकेशन मिळवू शकतात. हे यूजर्सला आधिक पारदर्शकता देण्यासह प्लॅटफॉर्मवर जबाबदार व्यवहाराला प्रोत्साहन देण्याच्या दिशेने टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. बहुतांश सोशल मीडिया मंच हा विशेषाधिकार केवळ काहीच खात्यांना देतात. Koo App असा पहिला प्लॅटफॉर्म आहे ज्याने आता प्रत्येक यूजरला समान विशेषाधिकार मिळवण्याचा हक्क दिलाय

हेही वाचा: Tata Neu App आज होणार लाँच; रेशनपासून बिल भरण्यापर्यंत अनेक सेवा उपलब्ध

ऐच्छिक स्व-पडताळणीसंदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs):

१. 'कू' वापरकर्त्याचा आधार क्रमांक जमा करते का?

- नाही. 'कू' आधार क्रमांक स्वतःकडे जमा करत नाही. आधार क्रमांक प्रमाणित करण्यासाठी UIDAI मान्यताप्राप्त तिसऱ्या घटकाची (थर्ड पार्टी) सेवा वापरली जाते.

२. प्रमाणिकरणानंतर माझे आधार कार्ड तपशील 'कू' वर दिसतील का?

- नाही. हे तपशील फक्त यूजर्सची सत्यता प्रमाणित करण्यासाठी वापरले जातात.

३. इतर यूजर्सना माझे नाव आणि आधार माहिती यांची महिती मिळते का?

- नाही. यूजर्सच्या प्रोफाईलवरील तपशील पडताळणीपूर्वी जसा होता तसाच राहतो.

४. 'कू'वर माझे आधार तपशील नोंदवणे सुरक्षित आहे का?

- होय. Koo वरची ऐच्छिक सेल्फ-व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्णतः सुरक्षित आहे. ही पडताळणी प्रक्रिया भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) अधिकृत थर्ड-पार्टीद्वारे केली जाते. 'कू' यूजरचा कोणताही डेटा साठवून ठेवत नाही.

हेही वाचा: Tata Curvv: आकर्षक डिझाईन अन् जबरदस्त फिचर्ससह येत आहे टाटाची बहुचर्चित कार

काय आहे कू?

'कू'ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. सध्या Koo मराठीसह इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू, तमिळ, आसामी, पंजाबी आणि बंगाली अशा 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. Koo ॲप भारतीयांच्या आवाजाचे लोकशाहीकरण करून त्यांना विचार शेअर करण्यासह आवडीच्या भाषेत मुक्तपणे व्यक्त होण्यास सक्षम बनवते. ‘कू’च्या अनोख्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, भाषांतर सुविधा. हे वैशिष्ट्य मूळ मजकुरातली भावना आणि संदर्भ जसेच्या तसे राखत युजर्सना त्यांचा संदेश विविध भारतीय भाषांमध्ये अनुवादित करून पाठवण्याची रिअल टाइम सुविधा देते. नुकतेच 'कू'ने 3 कोटीहून अधिक डाउनलोड्स आहेत. राजकारण, क्रीडा, माध्यम, कला, अध्यात्म या क्षेत्रातील 7 हजाराहून जास्त दिग्गज Koo च्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी नियमित संवाद साधत असतात.

Web Title: Koo Launches The Worlds First Platform To Launch Self Verification Feature

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..