कशासाठी साजरा होतो जागतिक छायाचित्र दिवस?

टीम ई सकाळ
Saturday, 19 August 2017

जागतिक छायाचित्र दिवसाचा इतिहास सुमारे पावणे दोनशे वर्षांचा. फ्रान्समध्ये याची सुरूवात झालेली. लुईस द गेरो आणि जोसेफ नायफोर यांनी 1837 मध्ये दगेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. या शोधामुळे छायाचित्रण सोपे बनले. 9 जानेवारी 1839 रोजी फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने दगेरोटाईप असे नामकरण घोषित केले. 19 ऑगस्ट 1837 रोजी फ्रान्स सरकारने या पेटंटची खरेदी केली आणि 'खुल्या जगासाठीची भेट, असे या शोधाचे वर्णन केले.

आज जागतिक छायाचित्र दिवस. जगभरातल्या फोटोग्राफर्सना प्रेरणा देणारा दिवस. मोबाईलच्या युगानंतर फोटोग्राफी प्रत्येकाच्या हातात आलीय तसा प्रत्येक क्षणच जणू छायाचित्रांमध्ये पकडण्याचा खटाटोप सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस म्हणून नेमका कशासाठी साजरा करतात, याची माहिती घेऊ या.

  • जागतिक छायाचित्र दिवसाचा इतिहास सुमारे पावणे दोनशे वर्षांचा. फ्रान्समध्ये याची सुरूवात झालेली.
  • लुईस द गेरो आणि जोसेफ नायफोर यांनी 1837 मध्ये दगेरोटाईप या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीचा शोध लावला. या शोधामुळे छायाचित्रण सोपे बनले.
  • 9 जानेवारी 1839 रोजी फ्रेंच अॅकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेने दगेरोटाईप असे नामकरण घोषित केले.
  • 19 ऑगस्ट 1837 रोजी फ्रान्स सरकारने या पेटंटची खरेदी केली आणि 'खुल्या जगासाठीची भेट, असे या शोधाचे वर्णन केले.

दगेरोटाईप हा काही पहिला फोटो नव्हता. त्याआधी 1826 मध्ये नायपे यांनी हेलिओग्राफी पद्धतीने 'व्ह्यू फ्रॉम द विन्डो अॅड ल ग्रास' या नावाने छायाचित्र प्रसिद्ध केले होते. 1861 मध्ये थॉमस सटन यांनी टिकावू रंगीत फोटोग्राफ कसा घ्यावा, याचा शोध लावला. त्यांनी लाल, हिरवा आणि निळा फिल्टर सर्वप्रथम वापरला. मात्र, तंत्रज्ञान पुरेसे विकसित नव्हते. या फोटोग्राफ्सचा दर्जा फारसा चांगला नव्हता.

कालांतराने फोटोग्राफीत सुधारणा होत गेली. मोबाईलचे युग अवतरले. जगभरातल्या फोटोग्राफर्सनी 19 ऑगस्ट 2010 रोजी पहिला जागतिक छायाचित्र दिवस आयोजित केला. जगभरातून 270 फोटोग्राफर्सनी यामध्ये भाग घेतला. त्यांचे फोटोग्राफ्स तब्बल 100 देशांमधल्या लोकांनी पाहिले. त्यानंतर दरवर्षी 19 ऑगस्ट हा जागतिक छायाचित्र दिवस म्हणून साजरा होऊ लागला.

(संदर्भ : worldphotoday.com)

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news about world photo day