I-phone बनवताना स्टीव्ह जॉब्जने पाहिलेलं स्वप्नं 15 वर्षांनी पूर्ण होणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

I phone

I-phone बनवताना स्टीव्ह जॉब्जने पाहिलेलं स्वप्नं 15 वर्षांनी पूर्ण होणार?

ॲपलचा आयफोन म्हणजे काय? या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी 99% लोकांना माहित असतं ते म्हणजे प्रीमियम फोन. बऱ्याच लोकांना त्याचे फीचर्सच माहीत असतात. तो एक क्वालिटी फोन आहे एवढंच माहीत असतं. पण प्रकरण एवढ्यावरच संपत नाही. तर या फीचर्स मागे पण बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात.

हेही वाचा: Mobile : दीड कोटींचे 198 आयफोन लंपास करणाऱ्या टोळीला अटक

तुम्हाला माहीत असेल नसेल पण आयफोन जेव्हा लाँच झाला होता तेव्हा टच स्क्रीन इंटरफेस असलेला हा एकमेव फोन होता. त्यावेळी स्टीव्ह जॉब्स म्हणाले होते की, हा स्मार्टफोन स्वतः 5 वर्ष पुढे आहे. त्यातले सर्व फिचर्स त्यावेळच्या स्मार्टफोन्सच्या तुलनेत खूपच पुढे होते.

हेही वाचा: आयफोन 14 'या' तारखेला होणार लाँच; प्री ऑर्डरची तारीख देखील उघड

ॲपल कंपनीला फोनमध्ये सिम कार्ड ट्रे नको होता

हा किस्सा सांगितला होता "आयपॉडचे जनक" अशी ओळख असलेल्या टोनी फॅडेल यांनी. कॉम्प्युटर हिस्ट्री म्युझियमचा एक स्पेशल इव्हेंट होता. त्या इव्हेंटमध्ये फॅडेल सांगत होते की, त्यावेळी आमचा आयफोन जगभरातील इतर फोन्सच्या तुलनेत खुपच पुढे होता. तेव्हा प्रत्येक फोनमध्ये सिम स्लॉट असायचं पण स्टीव्ह यांना वाटायचं की फोनवर एक होल सुद्धा खराब दिसतो.

हेही वाचा: आयफोन बंद पडल्याने ग्राहकास नुकसान भरपाई द्यावी : ग्राहक आयोग

त्यांनी त्यांच्या डिझाईन टीमला कामाला लावलं आणि सांगितलं की, जीएसएम ऐवजी सीडीएमए वर काम करा. त्यांच्या या डिझायनर्सना सुद्धा या तंत्रज्ञानाची माहिती नव्हती.

हेही वाचा: आयफोन १२ चे उत्पादन आठवडाभरासाठी ठप्प

आता हे तंत्रज्ञान नेमकं काय होतं?

तर सीडीएमए म्हणजे कोड-डिव्हिजन मल्टिप्लेक्सींग. मोबाइल फोनच्या सेकंड-जनरेशन (2 जी) आणि थर्ड-जनरेशन (3 जी) च्या वायरलेस कम्युनिकेशन्समध्ये हे तंत्रज्ञान वापरलं जातं. वायरलेस म्हणजे यात सिम कार्डची गरज नसते.

हेही वाचा: आयफोन चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच येतोय खिशाला परवडणारा 5G iPhone

हे तंत्रज्ञान अमेरीकेत मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. तेच जगातील बहुतेक भागात अजूनही जीएसएम तंत्रज्ञान वापरलं जातं.

म्हणजे आज ज्याप्रकारे मोबाईलचं सिम इन्सर्ट न करता फोन सुरू होतो तशी कल्पना स्टीव्ह यांना 15 वर्षांपूर्वी सुचली होती.

Web Title: Will I Phone Maker Steve Jobs Dream Come True After 14 Years

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..