Diwali Tourism :दिवाळीत करा प्लॅन कोकणातील ‘हे’ समुद्र किनारे पाहण्याचा

कोकण म्हणजे फक्त देवगड, रत्नागिरी तारकर्ली आणि सिंधुदुर्ग एवढेच नाही
Diwali Tourism
Diwali Tourismesakal

पुणे : कोकण म्हणजे फक्त देवगड, रत्नागिरी तारकर्ली आणि सिंधुदुर्ग एवढेच नाहीये. तर कोकण म्हणजे निखळ स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, हिरवीगार शेती आणि हापूस आंब्यासारखी गोड माणसे होय. कोकणात तुम्ही बऱ्याचदा गेला असाल. देवगड, तारकर्ली बीचवर वॉटर स्पोर्ट्सही केले असतील. पण तरीही कोकणातील काही ठिकाणे आजही तुम्ही पाहिली नसतील. दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे पेंडिंग राहिलेले ट्रीपचे प्लॅन्स आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे.

Diwali Tourism
Tourism : स्वस्तात मस्त पर्याय हवा असेल तर या पर्यटन स्थळांचा विचार नक्की करा

यंदाच्या दिवाळीत जवळ कुठेतरी जायचा प्लॅन करत असाल तर ही काही ठिकाणी तूम्हाला एका नव्या कोकणची अनुभूती देतील. कोकणाला ७२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. हिवाळ्याबरोबरच पावसाळ्यातही लोकांना इथे फिरायला आवडते. पण बकेट बऱ्याचदा प्लॅन केला जातो तो कोकणात फिरायला जायचा.

Diwali Tourism
World Tourism Day : पर्यावरणपूरक पर्यटनाची अनुभूती

कोकणातील पर्यटन स्थळे अनेक आहेत. कोकण पर्यटन स्थळे नक्की कोणती, तिथे कसं जायचं, कुठे फिरायचं असा प्रश्नही पडतो. कोकण दर्शन माहिती मराठी मध्ये आपल्याला नेहमीच जाणून घ्यायला आवडते. इथले समुद्रकिनारे, शुद्ध हवा, परिसर, हिरवळ या सगळ्याने मन प्रसन्न होऊन जाते. त्यासाठीच आज कोकणातील काही माहिती नसलेले किनारे पाहुयात.

Diwali Tourism
Tourism : प्रवास करताना कोणत्या चूका टाळाव्या?

श्रीवर्धन किनारा

पुण्यापासून जवळ असलेले व एकमेकांपासून अंदाजे १५ किमीच्या अंतरावर तीन बेस्ट किनारे आहेत. त्यामध्ये श्रीवर्धन, हरिहरेश्वर आणि दिवेआगर हे किनारे आहेत. त्यापैकी श्रीवर्धन हा एक सुंदर आणि स्वच्छ किनारा आहे. या किनाऱ्यावर प्रदूषणरहित मोकळ्या हवेत प्रसन्न वाटते. या सागरी किनाऱ्यावर बोटींग, सेलींग, पोहणे, बिच व्हॉली बॉल आणि बिच वॉकींग असे वॉटर स्पोर्ट करता येतात.

मुंबई - श्रीवर्धन किनारा 185 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईतून जाणार असाल तर पनवेल – पेण – कोलाड – माणगाव – म्हसळा – श्रीवर्धन.

पुणे - श्रीवर्धन किनारा 165 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातून जाणार असाल तर पुणे – ताम्हिणी – कोलाड – इंदापूर – माणगाव – म्हसळा – श्रीवर्धन.

Diwali Tourism
World Tourism Day : लाख रुपयांत करू शकता परदेशात पर्यटन

किहीम किनारा

अलिबाग जवळ असलेल्या किनाऱ्यांपैकी हा एक मनमोहक सुंदर किनारा आहे. अप्रतिम सौंदर्य, निरव शांतता आणि कोकणातील मातीची दरवळ यांचे मिक्श्चर असलेला हा एक अद्भुत किनारा आहे. या किनाऱ्यावर विविध प्रकारच्या वृक्षांची गर्द झाडी आहे. या झाडीत दुर्मिळ फुलपाखरं, पक्षी आणि फुलं देखील पाहायला मिळतात, त्यामुळे पक्षी, फुलपाखरू निरीक्षक, निसर्गप्रेमी पर्यटक इथे गर्दी करतात.

मुंबई - किहीम 142 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईतून जाणार असाल तर - पनवेल – पेण – वडखळ – अलिबाग – चोंढी-किहीम फाटा – किहीम

पुणे - किहीम 165 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातून जाणार असाल तर – अलिबाग – किहीम

Diwali Tourism
Tourism News : केरळमधील निसर्गाच्या कुशीत वसलेली पर्यटन स्थळ पाहिलाय?

तोंडवळी किनारा

तोंडवळी किनारा हा मऊ शुभ्र वाळूचा एक सुंदर समुद्र किनारा आहे. तो मालवणच्या उत्तरेला १९ किमी वर आहे. तोंडवळी किनाऱ्यावर बहुधा फारशी वर्दळ नसते परंतु इथे मंद समुद्री हवा सतत वाहात असते, त्यामुळं वातावरण तजेलदार असते. या किनाऱ्याजवळ जंगल असल्याने वाघोबाचा वावर असल्याचे सांगितले जाते.

मुंबई - तोंडवळी किनारा 555 किलोमीटर अंतरावर आहे. सायन – वाशी – पनवेल – पेण – मालाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल – चौके – मालवण – तोंडवळी किनारा.

पुणे - तोंडवळी किनारा 450 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातून जाणार असाल तर पुणे – पौड – मुळशी – ताम्हिणी घाट – माणगाव – महाड – पोलादपूर – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कासाळ – चौके – मालवण – तोंडवळी किनारा.

पुणे ते तोंडवळी (कोल्हापूरमार्गे) :

पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – राधानगरी – दाजीपूर – फोंडा – नांदगाव – कणकवली – कसाळ – चौके – मालवण – तोंडवळी किनारा.

Diwali Tourism
Tourism : महिलांनो तुम्हाला एकट्याला फिरायचं असल्यास 'या' ठिकाणांना भेट द्या...

चिवला किनारा

चिवला किनारा हा ‘सी’ आकारात पसरलेला असून २ किलोमीटर लांबीचा आहे. येथे शुभ्र आणि स्वच्छ पाणी आहे. हा अत्यंत शांत आणि स्वच्छ किनारा आहे.

मुंबई - चिवला किनारा 545 किलोमीटर अंतरावर आहे. सायन – वाशी – पनवेल – पेण – महाड – खेड – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल – चौके – मालवण – चिवला किनारा.

पुणे - चिवला किनारा 440 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे ते चिवला (कोल्हापूर मार्गे) : पुणे – सातारा – कराड – कोल्हापूर – राधानगरी – दाजीपूर – फोंडा – नादगाव – कणकवली – कसाल – चौके – मालवण – चिवला किनारा.

पुणे ते चिवला (ताम्हिणी घाट मार्गे) :

पुणे – पौड – मुळशी – ताम्हिणी घाट – माणगाव – महाड – पोलादपूर – चिपळूण – संगमेश्वर – हातखंबा – राजापूर – कणकवली – कसाल – चौके – मालवण – चिवला किनारा.

Diwali Tourism
Tourism News : केरळमधील निसर्गाच्या कुशीत वसलेली पर्यटन स्थळ पाहिलाय?

दिवेआगर किनारा

दिवेआगर किनारा सहा किलोमीटर लांबीचा असून इथे पांढरी शुभ्र वाळू आणि स्वच्छ पाणी आहे. इथे समुद्री पक्ष्यांचे अभयारण्य आहे. या किनाऱ्याभोवती सुरूची झाडे आहेत. दिवेआगर श्रीवर्धनपासून अंदाजे ५ किमी वर आहे. गावातील एका बागेत सोन्याची गणपतीची मूर्ती सापडल्यानंतर त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती.

कसं जाताल

मुंबई - दिवेआगर किनारा 185 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई – पनवेल – पेण – वडखळ नाका – नागोठणे – कोलाड – माणगाव – मोरबा – साई – म्हसळा - दिवेआगर

पुणे - दिवेआगर किनारा 165 किलोमीटर अंतरावर आहे. पुणे – पौड – ताम्हिणी घाट – विळे फाटा – निजामपूर – माणगाव – मोरबा – साई – म्हसळा - दिवेआगर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com