Rautwadi Waterfall : धबधब्यांवर हुल्लडबाजी करत असाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा होईल मोठं नुकसान!

उत्साहाच्या भरात हुल्लडबाज तरुणांनी नियमांचे केले उल्लंघन
Kolhapur Rain Update Rautwadi Waterfall
Kolhapur Rain Update Rautwadi Waterfallesakal
Summary

पावसाने उघडीप दिल्याने सुटीचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटकांनी धबधबे, घाटमाथे या ठिकाणी गर्दी केली.

कोल्हापूर : जिल्ह्यातील पावसाळी पर्यटनस्थळांवर (Rautwadi Waterfall) पर्यटकांनी हुल्लडबाजी करू नये, अशा सूचना पोलिस प्रशासनाने केल्या आहेत. तसेच अशा ठिकाणी बंदोबस्तही लावण्यात आला आहे. मात्र, तरीही काही तरुण हुल्लडबाजी करतात.

राऊतवाडी धबधब्याजवळ चार तरुणांना हुल्लडबाजी करताना पोलिसांनी पकडले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राधानगरी पोलिसांनी (Radhanagari Police) ही कारवाई केली. अमित संजय सुतार (वय ३४), रणजित महादेव गुरव (वय ३०), अमर रामचंद्र चौगुले (वय ३४) आणि विकास जयसिंग पाटील (वय ३५, सर्व रा. आरे, ता. करवीर) अशी या चौघांची नावे आहेत.

Kolhapur Rain Update Rautwadi Waterfall
Adv Ujjwal Nikam : 'पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार जयंत पाटलांनाच, गटनेत्यालाच आपल्याकडं वळवण्याची रणनीती'

पावसाने उघडीप दिल्याने रविवारच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील पर्यटकांनी धबधबे, घाटमाथे या ठिकाणी गर्दी केली. संभाव्य धोका लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने अशा सर्व ठिकाणी कडक बंदोबस्त लावला होता. तरीही काही हुल्लडबाज तरुणांनी उत्साहाच्या भरात नियमांचे उल्लंघन केले.

Kolhapur Rain Update Rautwadi Waterfall
Sharad Ponkshe : 'देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचं स्वप्न पूर्ण होईल'; काँग्रेसवर टीका करत पोंक्षेंचं मोठं विधान

राऊतवाडी धबधब्याच्या जवळ चौघांवर कारवाई करण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्ह्यातील सर्व प्रमुख पर्यटनस्थळी बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच फ्रेंडशिप डेच्या पार्श्वभूमीवर सर्व सायबर कॅफे, उद्याने, महामार्गावरील लॉज येथेही पोलिसांनी तपासणी केली. येथे अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरादी घेण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com