esakal | नाशिक विभागात दोन लाख रुग्णांची कोरोनावर मात! मृत्युदर १.९४ टक्का 
sakal

बोलून बातमी शोधा

corona commodities.jpg

उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. सद्यःस्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. विभागातून आजपर्यंत दोन लाख १६ हजार ५६ रुग्णांपैकी दोन लाख एक हजार ४१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.

नाशिक विभागात दोन लाख रुग्णांची कोरोनावर मात! मृत्युदर १.९४ टक्का 

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक रोड : उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक आहे. सद्यःस्थितीत उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे. विभागातून आजपर्यंत दोन लाख १६ हजार ५६ रुग्णांपैकी दोन लाख एक हजार ४१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण तब्बल ९३.२२ एवढे आहे. गुरुवारपर्यंत विभागात चार हजार २०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात कोरोनामुळे मृत्यू पावणाऱ्या रुग्णांचा मृत्युदर १.९४ टक्का इतका आहे. सद्यःस्थितीत विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये एकूण १० हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

नाशिक विभागात दोन लाख रुग्ण कोरोनामुक्त 
आरोग्य उपसंचालक डॉ. मल्लिकार्जुन पट्टणशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये सात लाख दहा हजार ८७८ अहवाल पाठविण्यात आले. त्यांपैकी दोन लाख १६ हजार ५६ अहवाल पॉझिटिव्ह आले असून, रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण ३०.३९ टक्के इतके आहे. तसेच विभागात १३ हजार ६९१ व्यक्ती होमक्वारंटाइन, तर ९७० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत ९० हजार ५७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ८२ हजार ५०८ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच सहा हजार ४४० रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.१० टक्के इतके आहे. आजपर्यंत एक हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.२२ टक्के; मृत्युदर १.९४ टक्का 
जळगाव जिल्ह्यात गुरुवारपर्यंत ५२ हजार २९२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ४९ हजार ३५४ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एक हजार ६९० कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३८ टक्के इतका आहे. आजपर्यंत एक हजार २४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १३ हजार १७७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, १२ हजार ४७२ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३३४ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.६४ टक्के इतके आहे. आजपर्यंत ३७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नगर जिल्ह्यात आजपर्यंत ५३ हजार ९३२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, ५१ हजार ५२५ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच एक हजार ५८५ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५३ टक्के इतके आहे. आजपर्यंत ८२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

नंदुरबार जिल्ह्यात रुग्ण अल्प 
नंदुरबार जिल्ह्यात आजपर्यंत सहा हजार ८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, पाच हजार ५५५ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३९१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.३२ टक्के इतके आहे. गुरुवारपर्यंत १३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

संपादन - ज्योती देवरे