अपघातांच्या खटल्यात चक्क दीड कोटीची भरपाई? 

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 15 डिसेंबर 2019

न्यायालयात शनिवारी (ता. 14) झालेल्या लोकअदालतीमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांतील खटल्यांची तडजोड करण्यात आली. भरपाईपोटी एक कोटी 45 लाखांची रक्‍कम विमा कंपन्यांतर्फे अदा केली जाणार आहे. 

नाशिक : न्यायालयात शनिवारी (ता. 14) झालेल्या लोकअदालतीमध्ये दोन वेगवेगळ्या अपघातांतील खटल्यांची तडजोड करण्यात आली. भरपाईपोटी एक कोटी 45 लाखांची रक्‍कम विमा कंपन्यांतर्फे अदा केली जाणार आहे. 

एसबीआय इन्शुरन्स कंपनीची भरपाई

शाळेत शिक्षक असलेल्या पवार यांचा 7 डिसेंबर 2016 ला वणी-सापुतारा मार्गावर अपघात झाला होता. पायी जात असताना ट्रकच्या धडकेत त्यांचे निधन झाले होते. एसबीआय इन्शुरन्स कंपनीने भरपाईपोटी 75 लाख रुपये भरपाई देण्याचे मान्य केले आहे. फिर्याददारांकडून ऍड. एफ. बी. सय्यद आणि झुबेर शहा यांनी काम पाहिले, तर विमा कंपनीतर्फे ऍड. पी. पी. पवार यांनी काम पाहिले. प्रतिनिधी शहनवाज बापे यांचेही सहकार्य लाभले.

हेही वाचा > PHOTOS : नदीत गाडी पडल्यानंतर दोन्ही अभियंते सीटबेल्ट काढण्यासाठी धडपडत होते... पण शेवटी ....

लोकअदालतीत विविध प्रकरणांवर सुनावणी 

अन्य एका खटल्यात एमएसईबीत कार्यरत कर्मचाऱ्याचा दुचाकीवरून जात असताना कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला होता. मनमाड-नगर मार्गावर हा अपघात 19 जानेवारी 2018 ला घडला होता. या प्रकरणात फ्यूचर जनरल इन्शुरन्स कंपनी 70 लाखांची रक्‍कम अदा करणार आहे. फिर्यादींकडून ऍड. एफ. बी. सय्यद यांनी, तर विमा कंपनीतर्फे ऍड. ए. आर. साठे यांनी काम पाहिले. सत्पाल सिंग राजपूत, संतोष यांचेही सहाय्य लाभले.

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half crore compensation for accident case Nashik Marathi News