बसमध्ये जवळपास ४० ते ४५ प्रवासी होते....पण मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने मात्र....

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 14 डिसेंबर 2019

दिंडोरी रोडवर तारवालानगर सिग्नल चौफुली येथे अपघात नित्याची बाब झाली असून, यात अनेक लोकांचा जीव गेला आहे. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. या चौफुलीवर प्रवासी वाहनांचेही अनेक वेळा अपघात झाले. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर कायम वर्दळ असते.

नाशिक : तारवालानगर येथील सिग्नलवर शुक्रवारी (ता. 13) सकाळी पावणेसहाच्या सुमारास ट्रक व बसदरम्यान झालेल्या अपघातात सात जण जखमी झाले. तारवालानगर सिग्नल चौफुली मृत्यूचा सापळा बनली असून, सिग्नलवर अपघात नित्याचीच बाब झाली आहे. या चौकात छोटा उड्डाणपूल उभारावा जेणेकरून अपघातांची समस्या सुटेल, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे केली आहे. 

असा घडला अपघात....

कळवण- नाशिक बस (एमएच 14- बीटी 0774) नेहमीप्रमाणे तारवालानगर येथील सिग्नलवरून पंचवटी कारंजाकडे जाताना पेठ रोडकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने (आरजे 38- जीए 0897) मागून धडक दिली. बसमध्ये जवळपास 40-45 प्रवासी होते. त्यापैकी सात जण किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध पंचवटी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

तारवालानगर सिग्नल चौफुली मृत्यूचा सापळा

दिंडोरी रोडवर तारवालानगर सिग्नल चौफुली येथे अपघात नित्याची बाब झाली असून, यात अनेक लोकांचा जीव गेला आहे. काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. या चौफुलीवर प्रवासी वाहनांचेही अनेक वेळा अपघात झाले. राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर कायम वर्दळ असते. शिवाय अमृतधाम ते हनुमानवाडी रिंगरोड पुढे गंगापूर रोडला जोडला आहे. दिंडोरी रोडवर नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे शेतकऱ्यांची व मालवाहतूक वाहनांची कायम वर्दळ असते. शिवाय "मेरी'चे प्रशासकीय कार्यालय, सीडीओ-मेरी शाळा, काकासाहेब देवधर शाळा व महाविद्यालय, आरोग्य विज्ञान विद्यापीठ, महावीर महाविद्यालय, म्हसरूळ येथील गावठाण वसाहत, नव्याने विकसित झालेल्या कॉलनी परिसरामुळे या मार्गावर कायम राबता असतो.

हेही वाचा > मी तक्रार करणार नाही, फक्त मला घरात घ्या!...'तिची' आर्त हाक... 

या मार्गावर अनेक भीषण अपघात झाले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने क्रॉसिंगसाठी छोटा उड्डाणपूल उभारावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. पंचवटी युवक समितीचे अध्यक्ष अभिजित राऊत, कार्याध्यक्ष किरण पानकर, उपाध्यक्ष धनंजय कोठुळे, सरचिटणीस सचिन दप्तरे, खजिनदार अजित पाटील, संतोष जगताप, रामेश्वर साबळे उपस्थित होते. 

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

हेही वाचा > पुन्हा सैराटचा थरार...बहिणीचे प्रेमसंबंध समजताच भावाने..

हेही वाचा > मोबाईलवर कार्टून दाखविण्याचे सांगत सात वर्षाच्या चिमुकलीला नेले वरच्या खोलीत..अन्.. 

हेही वाचा > महिलेचा आरडाओरड ऐकू आल्याने 'त्यांनी' तिथे जाऊन पाहिले...बघताच...

बघा > PHOTO : उपाशीपोटी वयात असलेली 'ती' परप्रांतीय तरुणी...भेदरलेल्या अवस्थेत टोल नाक्यावर उभी होती...त्यातच..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bus and truck accident at signal nashik marathi news