Dhule Food poisoning : विषबाधा झालेल्या प्रशिक्षणार्थींची खासदार डॉ. भामरेंकडून विचारपूस

Dhule Food poisoning : पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे १२० प्रशिक्षणार्थींना गुरुवारी (ता. १४) अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला.
MP Dr. Subhash Bhamre while meeting the police trainees who got food poisoning
MP Dr. Subhash Bhamre while meeting the police trainees who got food poisoningesakal

Dhule Food poisoning : येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सुमारे १२० प्रशिक्षणार्थींना गुरुवारी (ता. १४) अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला. शुक्रवारी (ता. १५) खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन विषबाधा झालेल्या प्रशिक्षणार्थी पोलिसांची भेट घेत त्यांच्या आरोग्याची चौकशी केली. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारांबाबत योग्य त्या सूचनाही केल्या. (Dhule Dr Subhash Bhamre visited police trainees who were poisoned and inquired about their health)

दरम्यान, संबंधित सर्व प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांवर येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तातडीने उपचार करण्यात आल्याने त्यांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे. विषबाधा झालेल्या १५ ते २० कर्मचाऱ्यांवर अद्याप उपचार सुरू असून, अन्य प्रशिक्षणार्थी पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. भामरे यांना दिली.

येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील १२० पोलिसांना गुरुवारी अन्नातून विषबाधा झाल्याने भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले.

MP Dr. Subhash Bhamre while meeting the police trainees who got food poisoning
Dhule Police Route March : कायदा-सुव्यवस्थेसाठी आम्ही सज्ज; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

याची माहिती मिळताच शुक्रवारी खासदार डॉ. भामरे, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी रुग्णालयास भेट देत विषबाधा झालेल्या पोलिस प्रशिक्षणार्थींची आस्थेने विचारपूस केली.

या वेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी डॉ. भामरे यांना त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची माहिती दिली. तसेच १५ ते २० प्रशिक्षणार्थी वगळता अन्य प्रशिक्षणार्थींना गुरुवारी सायंकाळी उशिरा डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगितले. या वेळी खासदार डॉ. भामरे यांनी कीटकनाशकांच्या फवारणीमुळे भाजीपाल्यातून किंवा अन्य कारणाने ही विषबाधा झाली असावी. असे असले तरी येथील हिरे रुग्णालयाच्या मेडिकल व पॅरा मेडिकल स्टाफने तातडीने योग्य ते उपचार केल्याने प्रशिक्षणार्थी पोलिसांच्या प्रकृतीचा धोका टळला आहे, याचे समाधान असल्याचे सांगितले.

MP Dr. Subhash Bhamre while meeting the police trainees who got food poisoning
Dhule News : हद्दवाढ गावांतील कामांना 5 कोटी मंजूर : आमदार कुणाल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com