सतत पालकांच्या बंधनात 'ती'...मोकळा श्वास घ्यायचा होता..एके दिवशी...

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 17 December 2019

तिने सायंकाळनंतर घराबाहेर पडायचे नाही, मैत्रिणींकडे जायचे नाही, एवढेच नव्हे तर तिच्यावर पालकांकडूनच अत्यंत बारकाईने नजर ठेवली जायची. या प्रकारांना ती कंटाळली होती. तिच्या मैत्रिणी मनसोक्त आयुष्याचा आनंद घेत असताना, तिला पालकांच्या बंधनात जगावे लागत होते. त्यामुळे तिची प्रचंड कुचंबणा होत होती. तिच्या मैत्रिणी कधीतरी एकमेकींकडे मुक्कामी राहायच्या. तिनेही पालकांकडे विचारणा केली होती; परंतु नेहमीप्रमाणे तिला नकारच मिळाला.

नाशिक : शहरातील एका 17 वर्षीय महाविद्यालयीन युवतीने पालकांनी घातलेल्या बंधनांना झुगारून देत घर सोडले. अखेर पालकांनी पोलिस ठाणे गाठल्यानंतर निर्भया पथकाने रात्रभर तिला शोधले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पथकाच्या हाती लागली. परंतु जेव्हा घर सोडण्याचे कारण समोर आले तेव्हा निर्भया पथकाच्या महिला पोलिसांना आश्‍चर्याचा धक्काच बसला. साऱ्या क्षेत्रात महिला स्वतंत्ररित्या अस्तित्व निर्माण करीत असताना, या युवतीच्या पालकांनी तिला अनेक बंधनांमध्ये अडकून ठेवले होते. 

पालकांकडूनच अत्यंत बारकाईने नजर होती...

गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका सुशिक्षित कुटुंबातील 17 वर्षीय महाविद्यालयीन युवती. तिने सायंकाळनंतर घराबाहेर पडायचे नाही, मैत्रिणींकडे जायचे नाही, एवढेच नव्हे तर तिच्यावर पालकांकडूनच अत्यंत बारकाईने नजर ठेवली जायची. या प्रकारांना ती कंटाळली होती. तिच्या मैत्रिणी मनसोक्त आयुष्याचा आनंद घेत असताना, तिला पालकांच्या बंधनात जगावे लागत होते. त्यामुळे तिची प्रचंड कुचंबणा होत होती. तिच्या मैत्रिणी कधीतरी एकमेकींकडे मुक्कामी राहायच्या. तिनेही पालकांकडे विचारणा केली होती; परंतु नेहमीप्रमाणे तिला नकारच मिळाला. अखेर, पालकांच्या या बंधनातून काही क्षण सुटका व्हावी म्हणून तिने शुक्रवारी (ता. 13) महाविद्यालयात जाते असे सांगून गेली, पण परत आलीच नाही. पालकांनी तिचा सगळीकडे शोध घेतल्यानंतर मध्यरात्री दीडच्या सुमारास त्यांनी गंगापूर पोलिस ठाणे गाठले.

हेही वाचा > हद्दची सबब नाही अशावेळेस...आपत्ती व्यवस्थापनात गुजरात पास, महाराष्ट्र फेल ?

हेही वाचा > "तुला मैत्रिणीने बोलावले आहे' असे सांगून 'तो' तिला फ्लॅटवर घेऊन गेला..अन्..

रात्रभर शोधमोहीम राबविली निर्भया पथकाकडून.....अखेर...

वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी तत्काळ निर्भया पथकाला खबर दिली. या पथकाच्या उपनिरीक्षक नेहा सूर्यवंशी यांनी दोन पथके तयार करून बेपत्ता युवतीचा शोध सुरू केला. तिच्या मैत्रिणींकडे चौकशी सुरू केली. रात्रभर शोधमोहीम राबविल्यानंतर शनिवारी (ता. 14) सकाळी तिचा माग निघाला. मैत्रिणीच्या घरी मुक्कामी आलेल्या तिला पथकाने विश्‍वासात घेऊन चौकशी केली असता, जे तिने सांगितले ते ऐकून महिला पोलिस अधिकाऱ्यांना धक्काच बसला. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या युवतीला तिचे पालक तिला मोकळे आयुष्य जगण्याचाही अधिकार देत नसल्याने आश्‍चर्याचा धक्का बसला. अखेर तिचे समुपदेशन केल्यानंतर तिच्या पालकांनाही पोलिस ठाण्यात पाचारण करण्यात आले. त्यांचेही समुपदेशन करण्यात आल्यानंतर तिला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.  

हेही वाचा > लग्नाच्या वाढदिवस होता 'त्याचा' त्यादिवशी..अन् अचानक हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश 

नक्की बघा > PHOTO : अरे बापरे! म्हशीच्या पोटातून 'हे' काय निघाले?

हेही वाचा > PHOTOS : नदीत गाडी पडल्यानंतर दोन्ही अभियंते सीटबेल्ट काढण्यासाठी धडपडत होते... पण शेवटी ....

हेही वाचा > अपघातांच्या खटल्यात चक्क दीड कोटीची भरपाई?​

हेही वाचा > "कुणाला काही सांगितले, तर तुझा नवरा अन् मुलांना मारून टाकीन', असे म्हणत दिरानेच वहिनीवर.....

नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Due to parental restrictions she left the house Nashik Marathi News