नमामि गंगेच्या धर्तीवर गोदावरीचे पुनरुज्जीवन... 

godavari river 1.jpg
godavari river 1.jpg

नाशिक : "नमामि गंगे'च्या धर्तीवर केंद्र सरकारतर्फे देशातील महत्त्वाच्या नऊ नद्या पुनरुज्जीवित करण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्यात नाशिकमधून वाहणाऱ्या गोदावरी नदीचा समावेश केला आहे. गोदावरीच्या पाच किलोमीटरपर्यंत दोन्ही तीरांवर इको पार्क उभारून नदी प्रवाहित ठेवली जाणार आहे. या संदर्भात उपाययोजनांचा सविस्तर प्रकल्प अहवाल 20 डिसेंबरपर्यंत सादर करण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या आहेत. 
भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देशभरातील प्रमख नऊ नद्या प्रदूषणमुक्त करण्याबरोबरच नैसर्गिकरीत्या नद्यांचा प्रवाह खळखळता ठेवण्यासाठी ही योजना आखली आहे.

पाच किलोमीटरपर्यंत उभारणार इको पार्क 
गंगा नदी सुशोभीकरण व प्रदूषणमुक्त करण्यासाठी केंद्र सरकार विशेष लक्ष देत आहे. त्याच धर्तीवर देशभरातील नऊ नद्यांसाठीदेखील विशेष योजना आखली जात असून, या नऊ नद्यांत नाशिकचा समावेश करण्यात आला आहे. प्रकल्पांतर्गत श्रीक्षेत्र सोमेश्वर ते अहिल्याबाई होळकर पुलापर्यंत पाच किलोमीटरपर्यंत नदीच्या दोन्ही तीरांवर पर्यावरणपूरक वातावरण तयार करण्यासाठी बायो फिल्ट्रेशन पार्क, पाण्यातील प्रदूषित घटक शोषून घेणारे वृक्षलागवड, जमिनीची धूप थांबविण्यासाठी गॅबियन वॉल आदी प्रकारची कामे केली जाणार आहेत. प्रकल्पासाठी सुमारे 100 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. 
 हेही वाचा > मी लेकरांना घेऊन तीन दिवसांपासून मंदिरात बसलीय..मी तक्रार करणार नाही, फक्त आम्हाला घरात घ्या...

डिसेंबरअखेरपर्यंत अहवाल 
गोदावरीच्या दोन्ही तीरांवर कुठले पर्यावरणपूरक प्रकल्प राबविता येतील, त्यासाठीचा खर्च आदींचा सविस्तर प्रकल्प अहवाल 20 डिसेंबरपर्यंत सादर करावा लागणार आहे. त्यासाठी उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. यापूर्वीदेखील महापालिकेने गंगा नदी सुशोभीकरणाच्या धर्तीवर सुमारे साडेचारशे कोटींचा प्रस्ताव सादर केला होता. स्मार्टसिटीअंतर्गत प्रोजेक्‍ट गोदा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आता नमामि गंगेच्या धर्तीवर नदीकाठी इको पार्क उभारण्याचा तिसरा प्रस्ताव आहे.  नक्की बघा > PHOTO : हॉटेलवर भेटायला आलीस.. तरच माझ्या मोबाईलमधील तुझे फोटो डिलीट करेन...नाहीतर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com