Bhausaheb Gosavi drawing rangoli in front of temples early in the morning during Navratri. In the second picture, the rangoli drawn by Gosavi on the sixth bead and decorated with greenery.
Bhausaheb Gosavi drawing rangoli in front of temples early in the morning during Navratri. In the second picture, the rangoli drawn by Gosavi on the sixth bead and decorated with greenery.esakal

Navratri 2023 : ‘तो’ रांगोळीतून फुलवितो भक्तिरसाचा मळा; देवी मंदिरांसमोर रांगोळी रेखाटण्याचा छंद

Navratri 2023 : ‘प्रत्येकालाच वेगवेगळ्या प्रकारचे छंद असतात. ते छंद जोपासण्यासाठी प्रसंगी आर्थिक झळही सहन करीत असतात. त्यासाठी ऊन, वारा, पाऊस आदींचाही विचार करीत नाही. त्यातून काय मिळेल, यापेक्षा मनाला खूप मोठे समाधान मिळेल... यासाठी ते अविरत छंद जोपासण्याचा प्रयत्न करीत असतात.

येथील भाऊसाहेब गोसावी हा युवक दहा वर्षांपासून रांगोळी काढण्याचा छंद जोपासत आहे. (hobby of drawing Rangoli during navratri in front of Devi temple dhule news)

नवरात्रीत भल्या पहाटे उठून देवीच्या मंदिरांसमोर रांगोळी काढून परिसर सुशोभित आणि प्रसन्न करण्याचा छंदही जोपासून आहे.

येथील भाऊसाहेब किराणा दुकानावर रोजंदारीने काम करतो. दिवसभर विविध कामांमध्ये व्यस्त असतो. कष्टाचे काम करीत असतानाही रांगोळी काढण्याचा छंद जोपासून आहे. त्याने काढलेल्या रांगोळ्या बघून सारेच प्रभावित होत असतात.

Bhausaheb Gosavi drawing rangoli in front of temples early in the morning during Navratri. In the second picture, the rangoli drawn by Gosavi on the sixth bead and decorated with greenery.
Navratri Festival : कोल्हापूरच्या अंबाबाईची मोहिनी रूपात पूजा; तुळजा भवानी दिसली केळीच्या बनात

विविध कार्यक्रमांच्या प्रसंगी भाऊसाहेबला आग्रहाने बोलविले जाते. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये चौकभर किंवा गावभर रांगोळी रेखाटण्याचे काम लीलया पार पाडतो. यासाठी जेवढे मानधन मिळेल, तेवढ्यावर समाधान मानतो.

सध्या नवरात्रोत्सव सुरू आहे. नवरात्रीत देवीच्या मंदिरासमोर भल्या मोठ्या रांगोळ्या काढण्याचे भक्तिकर्म गोसावी करीत आहे. हा छंद त्याला दहा वर्षांपासून जोपासला आहे. त्यासाठी कोणतेही मानधन अपेक्षित नाही. पहाटे चारपासूनच मंदिरांसमोर रांगोळी रेखाटून परिसर प्रसन्न करण्याचे काम भाऊसाहेब करीत आहे.

Bhausaheb Gosavi drawing rangoli in front of temples early in the morning during Navratri. In the second picture, the rangoli drawn by Gosavi on the sixth bead and decorated with greenery.
Navratri 2023 : अष्टमीला देवीच्या जागराला करा काळ्या चन्याची उसळ, जाणून घ्या रेसिपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com