जनता कर्फ्यू कोरोनाने उत्तररकार्य, गंधमुक्‍त रद्द 

corona
corona

चोपडा : कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर पावले उचलली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांसह लग्न समारंभासह इतर कार्यक्रमही रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर भारताचे आपणही एक नागरिक आहोत. कोरोनाशी मुकाबला करण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे भान ठेवून हातेड बुद्रुकला उद्या (ता. २३) होणारा एका उत्तरकार्याचा व गंधमुक्‍तीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. ग. भा. सरस्वताबाई धोंडू मोकाशे यांचे नुकतेच निधन झाले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता संचारबंदीस परिसरात शंभर टक्के प्रतिसाद लभला. बसस्थानक, रेल्वे स्थानक, बाजारपेठांमध्ये कमालीचा शुकशुकाट दिसून आला. विविध रस्तेही पूर्णपणे निर्मनुष्य होते. औषध विक्रेते व दवाखान्यांमध्ये मास्क घालून डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी अत्यावश्‍यक सेवा दिली. पोलिसांनी गस्त घालून नागरिकांना घरात बसण्याचे आवाहनही केले. 

अमळनेरला सन्नाटा 
अमळनेर : शहरातील धुळे- चोपडा रस्त्यावर शुकशुकाट होता. बस स्थानक, रेल्वे स्थानकात सन्नाटा दिसून आला. बस स्थानकाजवळ पोलीस कर्मचाऱ्यांनी काही तुरळक फिरणाऱ्या नागरिकांना घरात बसण्याचे आवाहन करून मास्क वापरण्याच्या सूचना केल्या. पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून विविध भागात तुकड्या नेमून चोख बंदोबस्त ठेवला. ढेकू रोड, पिंपळे रोड, सराफ बाजार, दाणा बाजार, लुल्ला मार्केट, भाजीपाला बाजारात पूर्णपणे शुकशुकाट दिसून आला. 

पारोळा महामार्गावर शुकशुकाट 
पारोळा : तालुक्यासह शहरातील नागरिकांनी जनता कर्फ्यूस शंभर टक्के प्रतिसाद दिला. कोरोना विषाणू मारण्यासाठी हवेत वायू सोडणार असल्याच्या अफवा होती. मात्र, पालिकेने सकाळी सातला सायरन वाजवून नागरिकांनी सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर पडु नका असे आवाहन केले. राष्ट्रीय महामार्गावर कमालीचा शुकशुकाट दिसून आला. मुख्य बाजारपेठ, रथ चौक, पीर दरवाजा, बुधनाथ महाराज मठ चौक ते मराठी शाळा क्रमांक एकपर्यंत आदी परिसरात एकही नागरिक दिसून आला नाही. 

एरंडोलला शंभर टक्के प्रतिसाद 
एरंडोल : मुख्याधिकारी किरण देशमुख, साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी पोलीस कर्मचारी व पालिका कर्मचाऱ्यांसमवेत शहरात सकाळपासूनच फिरून नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. परमिट रूढ बियर बार बंद असल्याने काही मद्यपींची गावठी दारू घेण्यासाठी गर्दी केली होती. 

धरणगाव शंभर टक्के बंद 
धरणगाव : जनता कर्फ्युमध्ये आज शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शासनाच्या आवाहनाला नागरिकांनी एकजुटीने दाद दिली. शहरातील औषध विक्रेत्यांची मोजकी दुकाने सोडल्यास सर्व दुकाने बंद होती. मोठे उद्योगही सर्वच बंद होते. कॉलनी परिसरात आणि गल्ली बोळातही कोणीच फिरकताना दिसून आले नाही. तहसीलदार नितीन कुमार देवरे, मुख्याधिकारी जनार्दन पवार, सहायक पोलीस निरीक्षक गुंजाळ, नगराध्यक्ष नीलेश चौधरी आदींनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले. काही ,स्वयंसेवी संस्थांनी नागरिकांना आव्हान केले होते. शहरात पोलिसांकडून गस्त सुरू होती. हवालदार संजय सूर्यवंशी दिवसभर बस स्थानक पॉइंटवर सेवा बजावत होते. 

चोपड्यासह तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद 
चोपडा : शहरासह चहार्डी, लासूर, अकुलखेडा, काजीपुरा, हातेड, घोडगाव, वेळोदेसह तालुक्यात जनता कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. शहरात नेहमी गजबज असलेल्या शिवाजी चौक, आझाद चौक, बस स्थानक, पंकज नगर स्टॉप, आशा टॉकिज चौक, मेन रोड, गांधी चौक, चिंच चौक, ग्रामीण पोलीस ठाणे सकाळी सातपासूनच शुकशुकाट होता. इतिहासात प्रथमच स्वयंपूर्तीने जनतेने दाद देत कर्फ्यु पाळला. पोलिसांनी ही यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com