चाळीसगावचे सर्व कोरोन संशयीतांचे अहवाल निगेटिव्ह 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

सर्व संशयीतांचे नमूने तपासणीसाठी धूळे येथे पाठविण्यात आले होते. आज सर्वांचा अहवाल प्राप्त झाला असून चाळीसगाव येथील सर्व संशयीतांसह इतर 34 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 

जळगाव : धुळे येथील कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या चाळीसगाव येथील 6 जणांना क्‍वारंनटाईन करण्यात आले होते. त्यांच्यासह इतर 34 संशयीतांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाकडून सुटकेचा निश्‍वास सोडण्यात आला. मात्र सायंकाळी 45 वर्षीय पुरुष तर 60 वर्षीय महिला संशयीताचा मृत्यू झाला. या दोघांचे नमूने तपासीसाठी पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. 

नक्की वाचा :  "लॉकडाऊन' मध्ये झाली पक्षीगणना...सातशे एकोनसत्तर पक्ष्यांची नोंद 
 

गेल्या काही दिवसात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चाळीसगाव येथील एक कुटूंबिय अंत्यविधीसाठी धूळे येथे गेले होते. याठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात हे कुटूब आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसानी तात्काळ या कुटूंबाला ताब्यात घेतले. त्यानंतर या कुटूंबाला शहरातील छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात क्‍वारंनाटाईन करण्यात आले होते. दरम्यान पाच दिवसानंतर यास सर्व संशयीतांचे नमूने तपासणीसाठी धूळे येथे पाठविण्यात आले होते. आज सर्वांचा अहवाल प्राप्त झाला असून चाळीसगाव येथील सर्व संशयीतांसह इतर 34 जणांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांनी दिली. 

अहवाल निगेटिव्ळ आल्याने समाधान 
दिवसेंदिवस कोरोनाचे संशयीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात होती. यामध्येच धूळे येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांना देखील क्‍वारंनटाईन करण्यात आले होते. तसेच दोन दिवसांपूर्वी मयत झालेल्या 30 वर्षीय युवकासह 75 वर्षीय वयोवृद्धांचा अहवाल प्राप्त झाले असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. 

 आर्वजून पहा : खरीप हंगामात कपाशीच्या पेऱ्यात यंदा 20 वाढ 

दोन संशयीतांचा मृत्यू 
श्‍वास घेण्यास त्रास होत असल्याने शहरातील 45 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिलेस गेल्या दोन दिवसांपूर्वी कोरोना वार्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतांना त्या दोघांचा आज सायंकाळी मृत्यू झाला. या दोघ संशयीतांचे नमूने तपासणीसाठी धुळे येथे पाठविण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

क्‍लिक कराः सोशल मीडियातून मोफत स्पोकन इंग्लिशचे धडे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Negative reports of all Coron's suspects in Chalisgaon