लग्नानिमित्त नवदांपत्याने वृक्षारोपणातून दिला पर्यावरणाचा संदेश

विजय पगारे
मंगळवार, 4 जुलै 2017

शासनाच्या चार कोटी वृक्षलागवड कार्यक्रमा अंतर्गत वृक्ष लावण्याची यशस्वी मोहीम सुरु असून, मोठ्या प्रमाणात वृक्ष संवर्धन करण्यासाठी पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी वृक्षलागवड करणे काळाची गरज समजून नवदाम्पत्य बादल व सोनालीने आपला सहभाग नोंदवला. 
- रंजना पैठणकर, मुख्याध्यापक अस्वली

इगतपुरी : वृक्षारोपण ही काळाची गरज समजून त्याचे जतन होण्यासाठी पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी स्वतःच्या विवाहप्रसंगी देखील आपले महत्वाचे  कर्तव्य समजून अस्वली स्टेशन येथील एका लग्न समारंभाप्रसंगी नवदाम्पत्यांनी  वृक्ष जतन करून पर्यावरणाचा संदेश दिला.
निफाड तालुक्यातील साकुरे येथील बादल शिंदे व अस्वली येथील सोनाली नाडेकर यांचा शुभविवाह आयोजित करण्यात आला होता यावेळी दोघेही एकमेकांच्या विवाह बंधनात अडकल्यानंतर त्यांनी येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करून कर्तव्य बजावल्याने त्यांचे परिसरातून कौतुक केले जात आहे.
पर्यावरणाचे असंतुलन,वाढते प्रदूषण याला आळा घालण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य, पिंपळगाव घाडगा,टाकेद बुद्रुक आदी गावांना वृक्षलागवड करण्यात आली. यानिमिताने पूर्वभागातील अनेक  मजुरांना देखील रोजगार मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. वन संवर्धन अभियानाच्या निमित्ताने 1 ते 7 जुलै या कालावधीत चार  कोटी वृक्ष लागवड करण्याचा शासनाचा उद्देश आहे. त्यानिमित्ताने येथील शाळेत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.प्रत्येक ठिकाणी वृक्ष लावावे लागणार असल्याने  झाडे लावण्यासाठी आवश्यक रोपे इगतपुरीच्या वनविभागाकडून मिळण्यास मोठी मदत झाली. 
तालुक्यातील नांदूरवैद्य ग्रामपंचायत परिसर,शाळा,पशुवैद्यकीय दवाखाना,प्राथमिक आरोग्य केंद्र, तलाव, तीर्थक्षेत्र याठिकाणी प्राधान्याने वृक्षलागवड करण्यात आली.वृक्षलागवड अभियान साध्य करण्यासाठी तालुकास्तरावर इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षलागवड सुरु आहे.

 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा - 
जियोची ‘धन धना धन’ ऑफर संपतेय; आता पुढे काय?​
500-1000 च्या जुन्या नोटा भरण्यासाठी पुन्हा संधी द्या : सर्वोच्च न्यायालय​
हिंदी महासागर क्षेत्रात चिनी पाणबुडीचा वावर​
शेतकरी कर्जमुक्तीची जिल्हानिहाय आकडेवारी
गुप्त विठोबाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुलवामातील तिसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा
मराठी तरुणांवर मध्य रेल्वेचा अन्याय; 432 युवक सेवेपासून वंचित​
विठूराया... शेतकरी कर्जमुक्त झाल्याशिवाय सुखी होणार नाही: मुख्यमंत्री फडणवीस​
GST च्या पारदर्शकतेचा लाभ सर्वांना!​
क्रिकेट : विंडीजचे फिल सिमन्सही भारताच्या प्रशिक्षकपदासाठी इच्छुक​
‘जीएसटी’बाबत सोशल मीडियावर अफवा​

Web Title: nashik news igatpuri newly married couple's tree plantation