नाशिक : जनसुविधेच्या कामांसाठी 30 कोटींचा निधी; 319 कामांना मंजुरी

Road Construction
Road Constructionesakal

नाशिक : जनसुविधेंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीअंतर्गत (Gram Panchayat) स्मशानभूमी शेड, ओटा बांधणे, सुशोभीकरण, पोचरस्ता तयार करणे आदी कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून (District Planning Committee) २०२१-२२ या आर्थिक वर्षात ३० कोटी २४ लाख रुपयांचा निधी (Funding) मिळाला आहे. यातून ३१९ कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागातील ही प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहेत.

२०२१-२२ या आर्थिक वर्षात ग्रामीण भागातील (Rural Areas) 319 कामांना 8 जानेवारीला झालेल्या जिल्हा नियोजन समिती (District Planning Committee) बैठकीत मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी 30 कोटी 24 लाख रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. यासाठी आता कामांचे अंदाजपत्रक (Budget) तयार करणे, जागा उपलब्ध असल्याचा उतारा जोडणे, ग्रामसभेचा (Gram Sabha) ठराव आदी बाबींचा पाठपुरावा करून प्रशासकीय मान्यता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी (District Collector) जिल्हा परिषद (ZP) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामांमध्ये सर्वाधिक कामे मालेगाव, निफाड, सिन्नर, येवला आदी तालुक्यांमधील, तर सर्वांत कमी कामे पेठ, सटाणा व देवळा तालुक्यांत आहेत.

Road Construction
Ukraine Russia War | रशियन सैन्याला मोठं यश, युक्रेनचं महत्त्वाचं शहर ताब्यात

तालुका कामांची संख्या

येवला ३४

चांदवड २१

इगतपुरी २४

निफाड ३९

मालेगाव ४२

सुरगाणा २०

दिंडोरी १६

कळवण १८

नाशिक २४

सिन्नर २८

पेठ दहा

त्र्यंबक १६

नांदगाव १३

सटाणा नऊ

देवळा पाच

Road Construction
Apple चा स्वस्तात मस्त 5G फोन लवकरच ! मार्चमध्ये होणार लॉंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com