Nashik News : डोंगराची काळीमैना बाजारात दाखल; आदिवासी बांधवांना मिळतोय रोजगार

Karwande
Karwandeesakal

Nashik News : रखरखत्या उन्हाळी हंगामात येणाऱ्या फळांची मेजवानी काही औरच असते. काही फळे तर डोंगराच्या कड्या कपाऱ्यात बहरलेले असतात. (black maina karwanda has entered market nashik news)

चवीने गोड, आंबट असे गुलाबी व बाहेरुन काळ्याकुट्ट रंगाच्या आकाराने छोटे असणाऱ्या काटेरी जाळीमध्ये विशेषतः जून महिन्यात पिकणाऱ्या करवंदाची म्हणजे डोंगराची ही काळी मैना बाजारात दाखल झाली आहे. मात्र, उन्हाच्या तीव्र फटका बसल्याने करवंदाच्या उत्पादनात घट दिसून येत आहे.

यावर्षी हा रानमेवा शहरातील चौकाचौकात व आठवडे बाजारामध्ये खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत तरी बेसुमार वृक्षतोडीमुळे व अधूनमधून भांड्याला लागणारा वणवा व निसर्गाच्या लहरीपणामुळे दुर्मीळ होत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात करवंदांची फळे मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Karwande
Nashik SSC Result Update : शहरासह ग्रामीणमध्ये सावित्रीच्या लेकीच हुशार..!

आदिवासी पश्चिम पट्यातील परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे करवंदांच्या जाळ्या मोठ्या प्रमाणात गळून गेल्या आहेत. हे फळ काटेरी जाळीतून काढणे कमालीचे असते दोन नागरिक दिवसभरात १० ते २० किलो करवंदे तोडून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी विक्री करून दोन पैसे मिळवितात. नगदी मापावर विक्री करतात.

काय आहे करवंदात

करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मधुमेहांसाठी तसेच त्वचा विकारांवर फायदेशीर ठरत असल्याने त्यामध्ये सायट्रिक ॲसिडच्या मुबलक प्रमाणामुळे तसेच उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर करवंद खाणे फायदेशीर असते. या गुणकारी फळांमध्ये विटॅमिन ही मुबलक असते, कॅल्शिअम हा पोषक घटक जास्त असल्याने हाडे मजबूत होतात.

"करवंदे हा रानमेवा आरोग्यवर्धक असून तो साधारण एक महिना असतो. या निमित्ताने रोजगार उपलब्ध होतो. रानमेवास आम्ही दोन घास देणारी देवता मानतो." - सुनील सूर्यवंशी, गोळवड

Karwande
Vatpornima News : झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत महिलांकडून वटपौर्णिमा उत्साहात साजरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com