नाशिक : खुल्या पर्यटन स्थळांवर लवकरच बंदी - पालकमंत्री भुजबळ

Chhagan bhujbal
Chhagan bhujbalesakal

नाशिक : दोन आठवड्यापासून कोरोनाच्या (Corona) रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत असल्याने प्रवेशद्वार ऩसलेल्या उघड्यावरील पर्यटन स्थळांवर जिल्ह्यात बंदी घालण्याचा तसेच, रामकुंडासारख्या धार्मिक तिर्थस्थळांवर शिस्तीचे पालन करण्यासाठी अधिक काटेकोर नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आजच्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आला.

दिवसागणिक कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने प्रशासनापुढील चिंता वाढली आहे. त्यामुळे नाशिक शहर जिल्ह्यातील कोरोनाचे निर्बंधाबाबत फेरविचार करण्यासाठी आज शुक्रवारी (ता.१४) पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांसह अनेक अधिकारी या बैठकीत ऑनलाईन सहभागी झाले होते.

Chhagan bhujbal
अंजली दमानियांच्या हायकोर्टातील याचिकेवर भुजबळांची प्रतिक्रीया, म्हणाले..

तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण सर्वाधिक

श्री. भुजबळ म्हणाले की, दोन आठवड्यापासून शहर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दिवसाला हजार ते दीड हजाराच्या संख्येने रुग्ण वाढत आहे. शहर - जिल्ह्यात सर्वत्र रुग्णसंख्या वाढत आहे. शहर ग्रामीण भागात तालुक्यात रुग्ण वाढत आहे. नाशिक शहर, निफाड, दिंडोरी तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. मात्र होम क्‍वारंटाईन राहूनच रुग्ण बरे होत आहे ही समाधानाची बाब आहे. निफाड, दिंडोरीसह नाशिक शहरात कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये येणाऱ्या व्‍यक्तीबाबत अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

मॉर्नींग वॉक सुरुच राहणार

प्रवेशद्वाराची सोय असलेल्या पर्यटनांची ठिकाणे यापूर्वीच बंद केली आहे. मात्र उघड्यावरील गर्दी होणाऱ्या पर्यटन स्थळांवर बंदी घालण्याची गरज आहे. त्यामुळे धऱणासह उघड्यावरील पर्यटन स्थळ बंद केली जाणार आहे. नाशिकला रामकुंड हे देशातील धार्मिक तिर्थक्षेत्र असून तेथे येणाऱ्यांची संख्या मोठी असते. तेथे पोलिस व महापालिका यंत्रणेने एकत्रितपणे उपाययोजना करुन विधींना प्रतिबंध न करता तेथील नियम अधिक काटेकोरपणे राबवावेत अशा सूचना दिल्या आहेत.

मालेगाव मॅजिकचे सुत्र

पहिल्या लाटेत देशभरात मालेगावला रुग्णसंख्या लक्षणीय होती. मालेगाव भागात कोरोना नियंत्रणासाठी अनेक उपाययोजना कराव्या लागल्या. मात्र त्याच मालेगाव भागात सध्या जेमतेम १३८ रुग्ण आहेत. यामागे तेथे हर्ड इम्युनिटी (Heard immunity/Antibody) विकसित झाली का, याचा अभ्यास सुरु आहे. ‘मालेगाव मॅजिकचे सूत्र' शोधण्याचे काम सुरु असल्याचे श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.

Chhagan bhujbal
संतापजनक! दिव्यांग महिलेला शिवीगाळ करत मारहाण

रुग्णसंख्या वाढीचा वेग

- २८ डिसेंबर ०४२१

- ०५ जानेवारी १४६१

- १३ जानेवारी ७८१४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com