D Pharmacy Admission : डी. फार्मसीच्‍या नोंदणीची आजपर्यंत वाढीव मुदत

D. Pharmacy Admission
D. Pharmacy Admissionesakal

D Pharmacy Admission : बारावीनंतर औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील डी. फार्मसी यांसह अन्‍य अभ्यासक्रमांच्‍या नोंदणीला पुन्‍हा एकदा मुदतवाढ मिळाली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने ही मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. ( Extension of registration of D pharmacy till today nashik news)

त्‍यानुसार गुरुवार (ता.३)पर्यंत पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. औषधनिर्माणशास्‍त्र शाखेतील डी. फार्मसी यांसह सरफेस ॲन्ड कोटिंग टेक्‍नॉलॉजी आणि हॉटेल मॅनेजमेंट ॲन्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी अशा तीन अभ्यासक्रमांना बारावीनंतर प्रवेशाची संधी उपलब्‍ध आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

D. Pharmacy Admission
Netflix Jobs: नेटफ्लिक्स देतंय बंपर नोकरीची ऑफर! पगार ऐकून बसेल धक्का

राज्‍यात मुसळधार पाऊस सुरू असल्‍याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, या उद्देशाने नोंदणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्‍यान, अंतिम गुणवत्तायादी शुक्रवारी (ता. ४) प्रसिद्ध केली जाणार असून, लवकरच प्रवेशाचे सविस्‍तर वेळापत्रक प्रसिद्ध केले जाणार असल्‍याचे तंत्रशिक्षण संचालनालयाकडून सांगण्यात आले.

D. Pharmacy Admission
Career Selection : पालकांनो मुलांनाच ठरवू द्या भविष्याची दिशा; अन्यथा होईल दुर्दशा...!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com