महावितरण
महावितरणesakal

वीजपुरवठा तोडल्याने शेतकरी आक्रमक; महावितरण कार्यालयात ठिय्या

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : परिसरातील उंबरखेड, बेहेड, अंतरवेली येथील शेतकऱ्यांच्या १५ रोहित्रांचा (Transformer) वीजपुरवठा ( Power supply) थकबाकी (Arrears) वसुलीसाठी महावितरणच्या (Mahavitaran) अधिकाऱ्यांनी तोडला. सुमारे १५० शेतकऱ्यांची शेती वीजपुरवठ्याअभावी कोरडी राहिली. अचानक झालेल्या कारवाईमुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी महावितरणवर धडक मोर्चा काढून महावितरणच्या तोंडचे पाणी पळविले. तब्बल सहा तास शेतकऱ्यांनी पिंपळगाव महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. अधिकाऱ्यांना घेराव घातला.

महावितरण
यशवंतरावांच्या विचारावर राज्याची वाटचाल : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

पिंपळगाव बसवंत उपविभागांतर्गत १३० कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी शुक्रवारी (ता. ११) पुन्हा ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले. उंबरखेडच्या सोमेश्‍वर मंदीराजवळील तर बेहेडेच्या सोनटेकडी परिसराचे रोहित्र यासह १५ रोहीत्रांचा वीजपुरवठा खंडीत केला. बेमोसमी पावसामुळे काढणी आलेल्या द्राक्षांना (Grapes) पाणी न दिल्यास घडांना तडे जातील.

महावितरण
कर्जबाजारी झालेल्या जिंतूर आगारातील बस चालकाची आत्महत्या

महावितरणने पुर्वसुचना न देता केलेल्या कारवाईमुळे उंबरखेडचे माजी उपसरपंच उध्दव निरगुडे, भाजपाचे युवा नेते सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, पंचायत समिती सदस्य राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली शंभरहुन अधिक शेतकऱ्यांनी पिंपळगाव महावितरणच्या कार्यालयाला धडक देत ठिय्या आंदोलन छेडले. द्राक्षाचे सौदे ( Deals) सुरू असून एप्रिलमध्ये थकित रक्कम भरतो. चालू बिल भरलेले असल्याने तात्काळ वीजपुरवठा सुरू करा अशी जोरदार मागणी लावुन धरली. पण महावितरणचे कार्यकारी अभियंता ( Executive Engineer) रवींद्र आव्हाड, उपकार्यकारी अभियंता एकनाथ कापसे, नितीन पगारे यांनी कृषी धोरण योजनेंतर्गत सवलतीचा लाभ घेऊन थकबाकी भरा, अशी भूमिका मांडली. शिवसेनेचे (Shiv Sena) नितीन बनकर, भाजपचे (BJP) प्रशांत घोडके, जयवंत निरगुडे, सुभाष आथरे, बाजीराव निरगुडे, सुरेश निरगुडे, किरण निरगुडे, अमोल गवळी, सुयोग भोसले, प्रकाश गवळी, सोपान भवर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांचा उद्रेक

बिल भरा, तरच वीजजोडणी करतो, असे आडमुठेपणाचे धोरण कायम ठेवल्याने शेतकऱ्यांचा उद्रेक झाला. काही शेतकऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा प्रयत्न केला. शेतकरी व महावितरणचे अधिकारी यांच्या संघर्ष अधिकच चिघळला. वीज पुरवठा केलाच पाहिजे, अशा घोषणांनी कार्यालय दणाणुन सोडले. संघर्ष टोकाला जात असताना पोलिसांनी मध्यस्थी केली. दरम्यान, वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुरवठा सुरू करण्याचा आग्रह शेतकऱ्यांंनी धरला. तसे प्रयत्नही झाले. पण मार्ग निघत नव्हता. दुपारी दोनचे सुरू झालेले आंदोलन रात्री आठपर्यत सुरू होते.

"पूर्वसूचना न देता वीजतोडणी हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. वीजबिल भरण्याची शेतकऱ्यांची मानसिकता आहे. पण द्राक्षांचे पैसे एप्रिलच्या मध्यावर येतील, तोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत ठेवावा; अन्यथा हाय व्होल्टचे आंदोलनाचा करंट आम्ही देऊ."

-सतीश मोरे (युवानेते, भाजप)

"शेतकरी आर्थिकदुष्ट्या डबघाईला आला आहे. द्राक्षांचे दर नीचांकी असल्याने खर्चही फिटणार नाही. शेतकऱ्यांनी सोने गहाण ठेवून भांडवल उभे केले. त्यात महावितरणने पठाणी वसुलीच्या नावाखाली वीजपुरवठा थांबविला आहे. शेतकरी आत्महत्येसाठी महावितरण प्रवृत्त करीत आहे."

-उद्धव निरगुडे (उंबरखेड)

"कृषी धोरण योजनेतून थकबाकीमुक्त होण्याची शेतकऱ्यांना संधी आहे. नियमित वीजबिल भरलेल्या शेतकऱ्यांची वीज तोडणी नाइलाजाने करावी लागली. थकबाकी वसुली न झाल्यास वीजपुरवठा करणे शक्य नाही."

-एकनाथ कापसे (उपकार्यकारी अभियंता,महावितरण)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com