Shettale Yojana : वॉटरबँकेला गती, बागायत फुलणार!

मागेल त्याला...योजनेंतर्गत विक्रमी साडेचारशे शेततळ्यांना मंजुरी
Shettale
Shettaleesakal

Shettale Yojana : शेतीसाठी पाणी या मुख्य संसाधनाची उपलब्धता होऊन दुष्काळी व कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना शेती करणे सोपे व्हावे यासाठी शासनाने शेततळे खोदण्यासाठी अनुदान योजना आणली आहे. (magel tyala shetatale scheme approval for record 450 farms nashik news)

मात्र मागील तीन वर्षात अडगळीत अडकलेली ही योजना शिंदे-फडणवीस सरकारने गती दिल्याने पुन्हा शेती पाणीदार होणार आहे. गेली अनेक वर्ष शेततळ्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.असून यावर्षी तालुक्यात तब्बल ४५७ शेततळे मंजूर झाले आहे. हे तळे पूर्ण झाल्यावर शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येणार आहे.

शासनाच्या मागेल त्याला शेततळे योजनेमुळे शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी आधार मिळाला असून अनेक गावात पीकपद्धतीत वेगाने बदल घडून येत आहे. शेततळ्यांमुळे अनेक शेतकऱ्यांना रब्बी व उन्हाळी पिके घेणे शक्य होत आहे.

एप्रिल १६ पासून योजना सुरू झाल्यानंतर तालुक्यातून तब्बल ४ हजार ६१८ शेतकऱ्यांनी शेततळयासाठी ऑनलाइन अर्ज केले होते. योजनेचा जून १८ पर्यत तालुक्याला एक हजार ५०० शेततळे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाला देण्यात आले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shettale
Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग

या योजनेला तालुक्याने प्रतिसाद दिल्याने २०१८ मध्ये तब्बल ७३० शेततळे पूर्ण झाले होते. ऑनलाइन अर्जानुसार ३ हजार ८७५ शेततळ्यांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले होते.त्यामुळे या योजनेतून तालुक्यात चार ते पाच हजार शेततळे पूर्णत्वास गेलेले आहेत.

आता ब्रेक के बाद...

ठाकरे सरकार आल्यानंतर या योजनेस ब्रेक मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांचे शेततळे रखडले होते. त्यातच कोरोनाही आल्याने दोन वर्ष कामकाज विस्कळित झाल्याने अनेक शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत होते. फेब्रुवारीमधील बजेटमध्ये शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा मागेल त्याला शेततळे योजना यावर्षीपासून लागू केली आहे.

विशेष म्हणजे त्याची लागलीच अंलबजावणी झाल्याने एकटयां येवल्यातच अर्ज केलेल्या ४५७ शेतकऱ्यांना शेततळे मंजूर झाले आहेत. ४५७ मधून चारशेच्या आसपास जरी शेततळे झाले तरी शेकडो एकर जमीन ओलिताखाली येणार आहे. कृषी विभागाने या शेततळ्यांच्या मंजुरीची पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.

Shettale
11th Admission Process : अकरावी प्रवेशाची पहिली यादी 19 ला; अर्जाचा भाग दोन भरण्याची प्रकिया या तारखेपासून

अशी होतेय निवड

महाडीबिटी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर कृषी विभाग त्या अर्जांतून पात्र लाभार्थ्यांची निवड करते किंवा सोडतीद्वारे निवड होते. त्यानंतर कृषी अधिकारी शेततळ्यासाठी स्थळ पाहणी करून त्यानंतर अंदाजपत्रक करून त्याला उपविभागीय अधिकाऱ्यांची मंजुरी घेऊन खोदाईला पूर्व संमती दिली जाते. क्षेत्राची आखणी करून खोदाई होते तर काम पूर्ण झाल्यावर मापे घेऊन अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या पद्धतीने योजनेत लाभार्थी निवड होते.

यांना मिळतो लाभ

योजनेचा लाभ देण्यासाठी शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.६० हेक्टर तांत्रिकदृष्ट्या पात्र जमीन असणे आवश्यक असून शेतकऱ्याने आधी अनुदान घेतलेले नसावे. योजनेअंतर्गत जितक्या आकाराचे शेततळे मंजूर झाले आहे तेवढ्याच आकाराचे शेततळे खोदणे बंधनकारक आहे.

Shettale
Nashik Rain Update : वादळी वाऱ्यासह पावसाने झाडे पडली उन्मळून; काही काळ वाहतूक ठप्प

शेततळ्याची काळजी, निगा राखणे ही शेतकऱ्यांची प्राथमिक जबाबदारी राहील. कृषी विभागामार्फत निश्चित केलेल्या जागेवरच शेततळे खोदणे बंधनकारक राहील. शेततळे अनुदान योजनेसाठी लॉटरी लागल्यानंतर कृषी सहाय्यक किंवा कृषी अधिकारी यांच्यामार्फतच्या आदेशान्वये पुढील तीन महिन्यात काम पूर्ण कर बंधनकारक असेल. यावर्षांपासून अनुदानात वाढ झाली असून आकारानुसार आता ५० ते ७५ हजार रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे.

"मागेल त्याला शेततळे योजनेत अनेक शेतकरी प्रतीक्षेत होते. कृषी विभागाने नुकतीच सोडत जाहीर केली असून येवल्यात ४५७ शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांच्या जागांचे स्थळपाहणी करणे सुरु आहे. अंदाजपत्रक व पूर्वसंमतीची कार्यवाही सुरु आहे. अजून इच्छुक शेतकऱ्यांनी शेततळ्यासाठी पोर्टलवर अर्ज दाखल करावेत." - मंगेश जंगम, तालुका कृषी अधिकारी, येवला.

Shettale
Nashik Rain Update : 5 हजार पक्षी असलेला Poultry shed वादळात जमीनदोस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com