नाशिक रोड- देवळालीगाव ते वालदेवी पुलावरील रस्ता रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत आहे. बिटको पॉइंट ते देवळाली कॅम्प या मार्गाचे रुंदीकरण झाले आहे. मात्र हा मार्ग अतिशय अरुंद आहे. त्यामुळे येथे कायमच वाहतूक कोंडी दिसून येते. ग्रामीण व शहरी अशी मिश्र लोकवस्ती या ठिकाणी आहे. भूसंपादनासाठी नागरिकांची जागा देण्याची तयारी असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण रखडले आहे.