Nashik Crime News : क्षुल्लक कारणावरून प्रवीणचा खून; अल्पवयीन संशयितांसह एकाला अटक

Murder
Murderesakal

Nashik Crime News : जेल रोड परिसरात ४३ वर्षीय प्रवीण दिवेकर यांचा खुनाची उकल करण्यात उपनगर पोलिसांना यश आले असून, मुख्य संशयितांसह एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलास अटक केली आहे. (Praveen murder for trivial reason one arrested along with minor suspects nashik crime)

जेवण आणि मद्याची पार्टी करताना झालेल्या क्षुल्लक वादातून संशयितांनी प्रवीणवर चाकू, विळीने गंभीर वार केले तर मद्याची बाटली डोक्यात मारून त्याच फुटलेल्या बाटली पोटात खुपसून प्रवीण यांचा निर्घृण खून केल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. दरम्यान संशयित पवार यास न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

तुषार सिद्धार्थ पवार (२९, रा. त्रिवेणी पार्क, इंद्र प्लाझा सोसायटी, व्यापारी बँकेसमोर, जेल रोड) असे मुख्य संशयिताचे नाव असून, याच्यासह उपनगर परिसरातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित तुषार पवार व मयत प्रवीण दिवेकर यांची एका संघटनेच्या माध्यमातून ओळख झाली होती.

रविवारी (ता. २८) सायंकाळी पाचच्या सुमारास दोघे संशयित हे दिवेकर यांच्या घरी जेवण व दारू पिण्यासाठी आले होते. रात्री उशिरापर्यंत त्यांची पार्टी सुरू होती. यादरम्यान दिवेकर यांनी तुषार यास ‘मी तुला मनसेचे पद मिळवून देतो, तू मला तुझ्या वडिलांकडून १५ हजार रुपये घेऊन दे’ असे म्हणाले. त्यास संशयित तुषार याने नकार दिला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Murder
Nashik Crime: मुन्नाभाई स्टाईल कॉपी करताना पकडले रंगेहाथ; नाशिकमध्‍ये घडला प्रकार

त्याचा प्रवीण दिवेकर यास राग आला आणि त्याने त्याच्याकडील चाकू संशयित तुषार यास मारून फेकले. तुषार बाजूला झाल्याने चाकू त्यास लागला नाही. परंतु त्यास प्रवीण याचा राग आला. त्याने किचनमध्ये जाऊन दुसरा चाकू आणला आणि प्रवीण याच्या छातीवर, पोटावर सपासप वार केले. जेवणाचा कुकर मारून फेकला.

तसेच जवळच असलेल्या विळीने प्रवीण यांच्या गळ्यावर वार केला. त्यानंतर दारुची बाटली प्रवीण यांच्या डोक्यात मारून फोडली. तीच बाटली त्याने प्रवीणच्या पोटात खुपसली. रक्ताच्या थारोळ्यात कोसळला आणि मयत झाला.

सदरील गुन्ह्याचा तपास परिमंडळ एकचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय पगारे, मुकेश क्षीरसागर, मिलिंद बागुल, एस.सी. लखन हे करीत आहेत.

Murder
Nashik Crime: चोरटे हुशार, तुम्ही करू नका माहिती उघड! बाहेरगावी जाताना Social Mediaपासून थोडे लांब राहा

त्र्यंबकला पलायन

संशयितांनी प्रवीण दिवेकर यांचा फोन व दुचाकीवरून त्र्यंबकेश्‍वरला पलायन केले. घटनेची माहिती प्रवीण याने फोन करून कोणाला सांगू नये म्हणून त्यांनी मोबाईल घेतला होता. त्र्यंबक परिसरात चाकू एका ठिकाणी लपवून ठेवला. तर अल्पवयीन मुलाच्या कपड्यांवर रक्ताचे डाग असल्याने त्यांनी ते कपडे जाळण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर ते आडगाव परिसरात परत आले.

तांत्रिक माहितीद्वारे तपास

घटनास्थळावरून पोलिसांना ठोस माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला. त्यावरून पोलिस मुख्य संशयितांपर्यंत पोहोचले. गुन्हशाखेचे विशाल काठे यांना संशयित तुषार आडगावात असल्याची खबर मिळाली असता, त्यास ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

मुख्य संशयित तुषार याचा खरेदी- विक्रीचा व्यवसाय आहे तर अल्पवयीन संशयित हा सीसीटीव्ही दुरुस्तीचे काम करतो. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, शहर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट एकचे पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, सहायक निरीक्षक हेंमत तोडकर, चेतन श्रीवंत, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, अप्पा पनवळ, नाझीम पठाण, मुक्तार शेख, किरण शिरसाठ यांच्या पथकाने संशयितांना अटक केली.

Murder
Nashik Fraud Crime: उत्राणेच्या नवरदेवास अडीच लाखाचा गंडा; नववधू पोलिसांच्या ताब्यात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com